VIDEO : खेळाडूंची शिवीगाळ अन् हाणामारी; फेडरर नंतर टेनिस कोर्ट झाले फाईट क्लब? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fight On Tennis Court

VIDEO : खेळाडूंची शिवीगाळ अन् हाणामारी; फेडरर नंतर टेनिस कोर्ट झाले फाईट क्लब?

Fight On Tennis Court : फेंच टेनिसपटू कॉरेंटिन मॉटेट आणि बल्गेरियाचा टेनिसपटू अँड्रियन एड्रीव हे सामन्यानंतर एकमेकांना भिडले. प्रकरण शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत पोहचलं. ही घटना ऑरलियन्स चॅलेंजर स्पर्धेच्या राऊंड ऑफ 16 मध्ये घडली. जागतिक क्रमवारीत 247 व्या स्थानवर असलेल्या एड्रीवने मॉटेटला 2-6, 7-6(7-3) 7-6(7-2) असे पराभूत केले. दरम्यान सामना झाल्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत असतानाच दोघांमध्ये बिनसले आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. अखेर पंचांनी खुर्चीवरून खालू उतरून दोघांना बाजूला केले.

रॉजर फेडरर निवृत्त झाला त्यानंतर त्याच्या फेअरवेल सामन्यावेळी त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदलला देखील अश्रू अनावर झाले होते. एकीकडे हे आदर्शवत दृष्य सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच अवघ्या काही दिवसातच दोन टेनिसपटू सामना झाल्यानंतर हस्तांदोलनावेळी एकमेकांना भिडतात हे चित्र टेनिस कोर्टवर पहावयाला मिळाले.

हेही वाचा: भारतात पहिल्यांदाच MotoGP चा थरार; CM योगी म्हणतात, UP साठी गौरवशाली क्षण

दरम्यान, संपूर्ण प्रकारानंतर मॉटेटने सोशल मीडियाद्वारे आपले म्हणणे मांडले. तो म्हणाला की, 'आजच्या सामन्यात जे काही झालं त्यानंतर मी माफी मागणार नाही. एखादा खेळाडू दोन वेळा जर मला गलिच्छ शिवीगाळ करत असेल तर माझ्याकडे त्याला माझ्या पद्धतीने समजावून सांगण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.'

हेही वाचा: Video : रोड सेफ्टी मालिकेत धमाका, 'Irfan Pathan अजूनही भारतीय संघाकडून खेळू शकतो'

मॉटेटने एड्रीवकडून ब्रेक पॉईंट घेत 3 - 0 अशी लीग घेतली होती. त्यानंतर त्याने तीन ब्रेक पॉईंट वाचवत पहिला सेट 6-2 असा खिशात टाकला. दुसऱ्या सेटमध्ये मॉटेट आणि एड्रीव दोघांनी ब्रेक पॉईंट घेतले. टाय ब्रेकरमध्ये मॉटेटने 3 - 1 अशी आघाडी घेतली होती. त्यापूर्वी एड्रीवने सलग 6 गुण जिंकत दुसरा सेट 7-6(7-3) असा जिंकला. एड्रीवने तिसरा सेट देखील असाच जिंकला. एड्रीवने टाय ब्रेकरमध्ये पाच गुण जिंकले आणि फ्रेंच खेळाडूला पराभवाची धूळ चारली.