Hockey World Cup: भारतीय संघाने दणादण ६ गोल करत मारलं मैदान! दक्षिण आफ्रिकेचा उडाला धुव्वा

India vs South Africa Women's Hockey : हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला संघाने मंगळवारी मोठा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ गोल करत हा विजय मिळवला. त्यामुळे पुढच्या फेरीतील स्थानासाठी भारताने प्रबळ दावेदारी ठोकली आहे.
India vs South Africa | Hockey World Cup 2026

India Women's Hockey Team

Sakal

Updated on

FIH Women's Hockey World Cup, India vs South Africa: हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने कमालीचा खेळ केला आहे. पहिल्या सामन्यात चीनला बरोबरीत रोखल्यानंतर दुसरा सामना मंगळवारी (१८ ऑगस्ट) दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध झाला. या सामन्यात भारतीय महिलांनी अफलातून खेळ करत संपूर्ण सामन्यात वर्चस्व ठेवले आणि दणादण गोल केले.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ६-१ अशा गोलफरकाने पराभूत करत पुढच्या फेरीतील प्रवेश जवळपास पक्के केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका पुल डीमध्ये आहेत. भारतीय महिला संघाचा पहिल्या फेरीतील अखेरचा सामना बलाढ्य इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com