धोनीच्या मित्राकडून टी-20 वर्ल्ड कप हिरोंचा खास सन्मान

क्रिकेटमधील अविस्मरणीय क्षण लवकरच पडद्यावर येणार
Team India
Team India

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या मैदानात भारतीय संघाने पहिला-वहिला टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) जिंकला होता. पहिल्या-वहिल्या स्पर्धेत भारतीय संघ फायनल मारेल, असा विचार त्यावेळी कुणीच केला नसेल. पण 24 सप्टेंबर 2007 रोजी महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) इतिहास रचला. पारंपारिक प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानला (Pakistan Cricket Team) नमवत भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.

एमएस धोनी (MS Dhoni) पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सुवर्णमयी इतिहास लिहिला. यावेळी महेंद्र सिंह धोनीने घेतलेले काही आश्चर्यकारक निर्णयाचीही जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. जोगिंदर शर्मासारख्या नवख्या गोलंदाजाची त्याने अंतिम षटक टाकण्यासाठी केलेली निवड सर्वांनाच चक्रावून टाकणारी होती. पण त्याचा निर्णय सार्थ ठरला आणि भारतीय संघाने पाकिस्तानला शह दिला.

Team India
धोनीचा फोटो क्रॉप केल्याचा आरोप,भज्जीनं टाकला 'दुसरा'

टी-20 वर्ल्ड कपचा तो अविस्मरणीय क्षण आता चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 14 वर्षानंतर वर्ल्ड कपचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणणार असल्याची घोषणा करण्यात आलीये. एमएस धोनीचा जवळचा मित्र आणि निर्माता गौरव बहिरवानी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2007 च्या आठवणीला उजाळा देणाऱ्या चित्रपटाचे नाव 'हक़ से इंडिया' असणार आहे. यात भारतीय संघाच्या यशाची कहाणी दाखवण्यात येईल. सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडिओ शेअर करत यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

Team India
IPL 2021: ट्रेंट बोल्टच्या बाबतीत 'असं' पहिल्यांदाच घडलं...

मिस्बाहचा तो चुकीचा फटका अन् भारतीय संघ जिंकला

जोहन्सबर्गच्या मैदानात रंगलेला अंतिम सामना चांगलाच रंगतदार झाला होता. पाकिस्तानचा फलंदाज मिस्बाह उल हक याने एक चुकीचा फटका खेळल्यामुळे भारतीय संघाच्या नावे इतिहासाची नोंद झाली होती. या सामन्यात भारतीय संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 157 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 19.3 षटकारत 152 धावांत आटोपला होता. जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर मिस्बाह उल हकने स्कूप शॉट खेळून श्रीसंतच्या हातात झेल दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com