IPL 2021: ट्रेंट बोल्टच्या बाबतीत 'असं' पहिल्यांदाच घडलं...

Trent-Boult
Trent-Boult
Summary

मुंबईच्या गोलंदाजांची KKRने केली धुलाई

IPL 2021 MI vs KKR: मुंबईविरूद्धच्या सामन्यात कोलकाताच्या युवा खेळाडूंनी केलेल्या झंजावाती खेळीच्या जोरावर KKRने ७ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या (५५) जोरावर ६ बाद १५५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर याने ३० चेंडूत ५३ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने ४२ चेंडूत ७४ धावा कुटल्या. कोलकाताच्या वादळी खेळीपुढे मुंबईच्या स्टार गोलंदाजांचाही निभाव लागला नाही. त्यामुळे, कोलकाताने विजय मिळवत नेट रनरेटच्या जोरावर Top 4 मध्ये प्रवेश केला आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सला खाली ढकलले. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्याबाबतीत एक विचित्र घटना घडली.

Trent-Boult
Video: बुमरा का जबाव नहीं! KKRच्या गिलची 'अशी' केली दांडी गुल

ट्रेंट बोल्टच्या नावावर पहिल्या षटकात आतापर्यंत १० बळी आहेत. म्हणजेच, त्याने पहिले षटक टाकत असताना १० बळी टिपले आहेत. पण काल मात्र, त्याला पहिल्या षटकात एकही बळी टिपता आला नाही. याउलट, आजपर्यंत कधीही न घडलेली घटना ट्रेंट बोल्टच्या बाबतीत घडली. बोल्टच्या पहिल्या षटकात शुबमन गिलने दुसऱ्या चेंडूवर तर व्यंकटेश अय्यरने चौथ्या चेंडूवर षटकार लगावला. पहिल्या षटकात दोन षटकार लागण्याची ही बोल्टची पहिलीच वेळ ठरली.

Trent-Boult
IPL 2021 Points Table: कोलकाताचा मुंबई इंडियन्सला 'दे धक्का'

यासोबतच, ट्रेंट बोल्टने आपल्या IPL कारकिर्दीत पहिल्या षटकात आतापर्यंत केवळ पाच षटकार खाल्ले. ट्रेंट बोल्टला आतापर्यंत ख्रिस गेलने २०१५मध्ये, लोकेश राहुलने २०१८मध्ये, जॉनी बेअरस्टोने २०२०मध्ये तर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी कालच्या सामन्यात पहिल्या षटकात उत्तुंग षटकार लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com