cricket
cricketsakal

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिला संघ पराभूत

मितालीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात २० हजार धावांचा टप्पा ओलांडला.

Harrup Park, Mackay : भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ९ गडी आणि ५४ चेंडू राखून पराभव केला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटमधील सलग २५ व्या विजयाची नोंद करत दोन गुणांची कमाई केली आहे. मिताली राजच्या ६३ धावांच्या जोरावर भारताने दिलेले २२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॅचेल हेन्स (नाबाद ९३) आणि एलिसा हिली (७७) यांनी २१ षटकांत १२६ धावांची सलामी दिली. हिलीला पूनम यादवने बाद केले. मात्र हेन्सने कर्णधार मेग लॅनिंगच्या (नाबाद ५३) साथीने दुसऱ्या गड्यासाठी १०१ धावांची भागीदारी रचून भारतीय संघाला पराभूत केले.

कर्णधार मिताली राजच्या (१०७ चेंडूंत ६३ धावा) सलग पाचव्या अर्धशतकानंतरही भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पराभव झाला आहे. डार्सी ब्राऊनच्या ३३ धावांत ४ बळी आणि फलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा ९ गडी आणि ५४ चेंडू राखून पराभव केला.

cricket
अकोला : जिल्ह्यात ऑगस्टअखेर हजार मुलांमागे ९७२ मुलींचा जन्म

मितालीचा कारकीर्दीतील २० हजार धावांचा टप्पा पूर्ण

मितालीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात २० हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी प्रकारात ६६९, एकदिवसीय सामन्यामध्ये ७,३६७ आणि ट्वेन्टी-२० मध्ये २,३६४ धावा केल्या आहेत. तसेच मितालीने फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानही कायम राखले.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ८ बाद २२५ (मिताली राज ६३, यस्तिका भाटिया ३५; डार्सी ब्राऊन ४/३३)

ऑस्ट्रेलिया : ४१ षटकांत १ बाद २२७ (रॅचेल हेन्स नाबाद ९३, एलिसा हिली ७७, मेग लॅनिंग नाबाद ५३)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com