VIDEO: रैनाच्या जर्सी नंबरवर चहलचा कब्जा; मॅनेजरकडून मागून घेतला नंबर

राजस्थान फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
FIRST REACTION When we bought Jersey no 3 Yuzvendra Chahal Rajasthan Royals
FIRST REACTION When we bought Jersey no 3 Yuzvendra Chahal Rajasthan Royals sakal

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा हंगाम 26 मार्चपासून सुरू होत आहे. दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी खेळला जाणार आहे. सर्व संघांनी तयारी जवळपास पूर्ण केली आहे. दरम्यान, स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहलची नवी जर्सीही तयार झाली आहे.

चहलच्या जर्सीचा नंबरही समोर आला आहे. चहल राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. यावेळी त्याला राजस्थान संघाने मेगा लिलावात 6.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गेल्या मोसमात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळत होता.

राजस्थान फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. चहलने हे ट्विट रिट्विट केले आहे. टीम मॅनेजर रोमी भिंडरने व्हिडिओमध्ये चहलला फोन करून त्याचे टीममध्ये स्वागत केले, तसेच तुला लवकरच गुलाबी जर्सीत पाहायचे आहे, असेही ते सांगतात. यावेळी चहलने आपल्या जर्सीचा क्रमांक 3 हवा अशी मागणी केली. यावर टीम मॅनेजर रोमी भिंडरने तुझ्या जर्सीचा क्रमांक हा 3 च असल्याचे सांगितले. यापूर्वी जर्सीनंबर ३ वर सुरेश रैना दावा सांगत होता. मात्र यंदाच्या आयपीएल लिलावात रैना अनसोल्ड राहिला. त्यामुळे युझवेंद्र चहलने संधी साधली.

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची लिलावात बेस प्राईस 2 कोटी होती. चहलला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये चढाओठ सुरू होते, शेवटी राजस्थान रॉयल्सने हा फिरकीपटू 6.5 कोटी रुपयांना विकत घेतले.

आरसीबी संघाने चहलला रिटेन केले नव्हते. त्यामुळे तो लिलाव प्रक्रियेत उतरला होता. चहल आयपीएलमध्ये तिसऱ्या संघाकडून खेळणार आहे.

चहलने 2011 पासून आयपीएलमध्ये आगमन केले. काही काळ मुंबई इंडियन्स कडून खेळल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळू लागला. युझवेंद्र चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 114 सामने खेळले असून 22.28 च्या सरासरीने 139 विकेट घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com