
IND vs WI: रोहित अँड टीमला मिळाला व्हिसा, शेवटचे 2 सामने अमेरिकेतच
India and West Indies : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन T20 आंतरराष्ट्रीय सामने अमेरिकेत होणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले. खेळाडूंना अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने आगामी दोन सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, परंतु आता भारत आणि वेस्ट इंडिज संघाच्या सर्व सदस्यांना अमेरिकेला जाण्यासाठी अधिकृतपणे मंजुरी देण्यात आल्याची बातमी आली आहे.
हेही वाचा: Team India: भारताला Asia Cup जिंकून देणारे 'हे' 3 खेळाडू ह्या वेळेस नाही खेळणार
रोहित शर्मा आणि कंपनीला फ्लोरिडा सामन्यांसाठी व्हिसा मिळाला आहे. रविचंद्रन अश्विन फ्लोरिडाला पोहोचला आहे. रोहित शर्मा, राहुल द्रविड, संजू सॅमसन आणि इतर 11 जणांकडे अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा नव्हता, मात्र आता संपूर्ण टीमला व्हिसाची मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच टी-20 मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना फ्लोरिडामध्येच खेळवला जाईल. वेस्ट इंडिजचा संघ आधीच अमेरिकेत पोहोचला आहे.
हेही वाचा: CWG2022 : तेजस्वीन शंकरची हाय जंपमध्ये ऐतिहासिक कामगिरी, कांस्यपदक जिंकून रचला इतिहास!
क्रिकबझच्या अहवालानुसार ज्या खेळाडूंकडे व्हिसा नव्हता. त्याला गयाना येथील अमेरिकन मुलाखतीसाठी पाठवण्यात आले होते. तिसर्या T20 सामन्यानंतर ही मुलाखत झाली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा समावेश आहे. रवींद्र जडेजा, आर अश्विन, दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई, सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव आधीच अमेरिकेला पोहोचले आहेत. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने पुढे आहे. अशा परिस्थितीत चौथा टी-20 सामना जिंकून टीम इंडियाच्या नजरा सीरिज जिंकण्यावर असतील.
Web Title: Florida T20is On As India And West Indies Players Obtain Us Visa After Guyanas President Intervention Ind Vs Wi Sports Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..