इटली, नेदरलॅंड्‌सची लक्षवेधक कामगिरी विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरलेल्या सर्बियाकडून निराशा; मोरोक्कोचा सफाईदार विजय

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

विश्‍वकरंडकाचे तिकीट मिळवलेल्या सर्बियाने स्पर्धा सरावाच्या चिलीविरुद्धच्या लढतीत हार पत्करली; पण मोरोक्कोने आपली कामगिरी उंचावत असल्याचे स्लोवाकियाविरुद्धच्या 2-1 विजयाने दाखवले. वर्ल्डकपचे तिकीट मिळवण्यात अपयशी ठरलेल्या इटली-नेदरलॅंड्‌स लढतीनेच चमकदार खेळाचा खरा आनंद दिला. 

झुरिच - विश्‍वकरंडकाचे तिकीट मिळवलेल्या सर्बियाने स्पर्धा सरावाच्या चिलीविरुद्धच्या लढतीत हार पत्करली; पण मोरोक्कोने आपली कामगिरी उंचावत असल्याचे स्लोवाकियाविरुद्धच्या 2-1 विजयाने दाखवले. वर्ल्डकपचे तिकीट मिळवण्यात अपयशी ठरलेल्या इटली-नेदरलॅंड्‌स लढतीनेच चमकदार खेळाचा खरा आनंद दिला. 

दक्षिण अमेरिकन विजेत्यांच्या आक्रमणास सामोरे जाण्याची सर्बियाची तयारीच नव्हती. गुईलेर्मो मारिपन याने 89 व्या मिनिटास हेडर करीत चिलीस विजयी केले. चिलीचा खेळ सर्बियाच्या तुलनेत खूपच सरस होता. प्रभावी पासेसच्या जोरावर मोरोक्को सलग अकराव्या सामन्यात अपराजित राहिले. ते 59 व्या मिनिटास मागे पडले खरे; पण त्यानंतर 10 मिनिटांत त्यांनी दोन गोल करीत बाजी मारली. 

सराव लढतीत ब्रेक असलेल्या पोलंडला बचावपटू कामिल गिल्क याच्या दुखापतीचा फटका बसला. संघात स्थान दिल्यानंतर काही वेळातच गिल्कचा खांदा दुखावला. 

नॅथन सेक याने दोन मिनिटे असताना केलेल्या गोलमुळे नेदरलॅंड्‌सने इटलीतील लढत बरोबरीत सोडवली. पूर्वार्धातील सदोष नेमबाजीवर मात करताना इटलीने उत्तरार्धाच्या दुसऱ्या टप्प्यात गोल केला; पण अखेर त्यांचा विजय हुकलाच. अती आक्रमकता दाखवल्यामुळे इटलीस एका खेळाडूस मुकावे लागले. त्याचा फायदा नेदरलॅंड्‌सने घेतला. 

Web Title: football world cup Practice match