चहाच्या दुकानात काम करणारा 'पेले' कसा बनला महान फुटबॉलपटू; जाणून घ्या मनाला भिडणारी कहाणी I Pele Passed Away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Football Player Pele Passed Away

शतकातील महान फुटबॉलपटू पेले यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा गाठला आहे.

Pele Passed Away : चहाच्या दुकानात काम करणारा 'पेले' कसा बनला महान फुटबॉलपटू; जाणून घ्या मनाला भिडणारी कहाणी

Football Player Pele Passed Away : शतकातील महान फुटबॉलपटू पेले (Footballer Pele) यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा गाठला. 3 विश्वचषक जिंकणारा तो जगातला एकमेव फुटबॉलपटू होता.

1940 मध्ये जन्मलेल्या पेले यांनी वयाच्या 15 व्या वर्षी सॅंटोस क्लबसाठी (Santos Club) आणि नंतर वयाच्या 16 व्या वर्षी ब्राझीलसाठी पदार्पण केलं. तद्नंतर पेलेंनी संपूर्ण जगाला फुटबॉलचे धडे दिले. आपल्या कारकिर्दीत एकूण 1279 गोल करणारा महान फुटबॉलपटू पेले जगाला फुटबॉल शिकवत गेला. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा: Pele passes away: तीन वर्ल्डकप जिंकणारे पेले हे एकमेव! जाणून घ्या सर्व रेकॉर्ड

1999 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (International Olympic Committee) त्यांना शतकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडलं. पेलेसारखे खेळाडू शतकात एकदाच घडतात, पण इथपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. कदाचित, चहाच्या दुकानात काम करत असताना त्यानंही आपण शतकातील महान फुटबॉलपटू होईल याची कल्पना देखील केली नसेल. पेले होणं अजिबात सोपं नाही, त्यांच्या संघर्षाची कहाणी जाणून तुम्हीही तेच म्हणाल..

हेही वाचा: Pele Passes Away: खरंच पेले यांनी एक भयंकर युद्ध रोखलं होतं का? का म्हणायचे शांतीदूत जाणून घ्या

चहाच्या दुकानात काम करायचे पेले

23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलमध्ये जन्मलेले पेले कमाईसाठी चहाच्या दुकानात काम करायचे. त्यांना लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती. सुरुवातीच्या काळात ते अनेक संघांसोबत खेळले. त्यांनी 2 यूथ स्टेट चॅम्पियनशिपमध्ये बौरू अॅथलेटिक (क्लब Bauru Athletic Club) ज्युनियर्सचं नेतृत्व केलं.

हेही वाचा: Pele Passes Away: कलकत्याच्या रस्त्यांनी एवढी गर्दी कधीच पाहिली नव्हती, पेले भारतात आला होता तेव्हा...

इनडोअर फुटबॉलनं सुरू झाला प्रवास

पेलेंच्या महानतेचा प्रवास इनडोअर फुटबॉलनं सुरू झाला. ते एका संघात सामील झाले आणि त्यानंतर इनडोअर फुटबॉल देखील खूप लोकप्रिय झालं. आपल्या भागातील पहिली फुटसल स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचाही ते एक भाग होते. पेले आणि त्यांच्या संघानं पहिलं विजेतेपद जिंकलं आणि येथूनच शतकातील महान खेळाडू होण्याच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली.

हेही वाचा: Pele Passes Away: फुटबॉलचा देव गेला ! ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचे निधन !

विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण फुटबॉलपटू

वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत पेले फुटसल (Futsal) खेळत राहिले. यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी सॅंटोस क्लबच्या वतीनं पदार्पण केलं आणि फुटबॉलच्या जगात पाऊल ठेवलं. एका वर्षानंतर, पेले यांनी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात प्रवेश केला आणि त्यांच्या प्रवेशाच्या एका वर्षानंतर, पेले विश्वचषक जिंकणारा जगातील सर्वात तरुण फुटबॉलपटू बनला. यानंतर त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही.