Nadal clay court legacy French Open 2025: क्ले कोर्ट अर्थात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत एकहाती सत्ता गाजवणाऱ्या राफेल नदालचा काल विशेष सत्कार करण्यात आला. टेनिसमधून निवृत्ती घेतलेल्या नदालने त्याच्या कारकीर्दित १४ फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्या, ज्या सर्वाधिक आहेत. त्यामुळेच त्याला 'लाल बादशाह' म्हटले जाते. त्याच्या पायाचा ठसा कायमचा आता रोलँड गॅरोसच्या कोर्टवर उमटला आहे. आयोजकांकडून मिळालेल्या या सन्मानानंतर नदाल गहिवरला अन् त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या सोहळ्याला त्याच्यासोबतचे कट्टर प्रतिस्पर्धी अन् तितकेच चांगले मित्र रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच व अँडी मरे हेही उपस्थित होते.