Jahanara Alam Accuses Chief Selector of Sexual Harassment
esakal
बांगलादेशची माजी महिला क्रिकेटपटू जहांआरा आलमने चीफ सिलेक्टरवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी समितीही गठीत करण्यात आली आहे. ही समिती पुढच्या १५ दिवसांत त्यांचा अहवाल सादर करणार आहे. मुख्य निवड समिती प्रमुख आणि संघ व्यवस्थापक मंजुरुल इस्लाम यांच्याविरुद्ध हे आरोप करण्यात आले आहेत.