माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते चेतन चौहान यांचे निधन

टीम ई-सकाळ
Sunday, 16 August 2020

12 जुलै रोजी चेतन चौहान कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर लखनौतील संजय गांधी पीजीआय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यानंतर गुंतागुंत वाढल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही,

नवी दिल्ली : भारताचे माजी सलामीवीर चेतन चौहान यांचे आज लखनौतील रुग्णालयात निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात कोरोनाशी लढा देत होते. 12 जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर लखनौतील संजय गांधी पीजीआय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यानंतर गुंतागुंत वाढल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, परिणामी गुरग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.

इतर क्रीडा बातम्यांसाठी येथे क्लिक करा

उत्तर प्रदेशचे मंत्री
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर चौहान यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला होता. 
1991मध्ये ते उत्तर प्रदेशातील आमरोहा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 1998मध्ये पुन्हा त्यांनी आमरोहा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. पण, 1996, 1999, 2004च्या निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भारतीय जनता पक्षाचे ते सक्रीय नेते होते. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ते सध्या कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होते. 

उत्तर प्रदेशात मंत्र्यांना कोरोना 
उत्तर प्रदेशात सुरुवातीला मंत्री ब्रिजेश पाठक यांना कोरोनाची लागण झाली. चेतन चौहान यांच्या आधी गेल्या आठवड्यात शिक्षणमंत्री कमल रानी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. यांच्यासह उपेंद्र तिवारी, जय प्रतापसिंह, राजेंद्र प्रतापसिंह, धर्म सिंह सैनी, मोती सिंह, महेंद्र सिंह या मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former cricketer chetan chauhan dies due to coronavirus