
माजी क्रिकेटपटू केदार जाधवने आज म्हणजेच मंगळवार, ८ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक चव्हाण यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षीच केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.