esakal | ICCची क्रमवारीची पद्धत म्हणजे निव्वळ कचरा : मायकेल वॉन
sakal

बोलून बातमी शोधा

Former England skipper Michael Vaughan calls ICCs ranking system absolute garbage

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा अनुक्रमे क्रमांक लागतो. मात्र, वॉनच्या मते न्यूझीलंड आणि इंग्लंड यांना कसोटी क्रमवारीत मिळाळेले अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान योग्य नाही. 

ICCची क्रमवारीची पद्धत म्हणजे निव्वळ कचरा : मायकेल वॉन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेलबर्न : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारी पद्धतीवर सडकून टीका केली आहे. ''मी आयसीसीच्या क्रमावारीबद्दल एकदम स्पष्टच बोलेन. माझ्यामते ही क्रमवारी निव्वळ कचरा आहे,'' अशा शब्दांत वॉनने आयसीसी क्रमवारी पद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा अनुक्रमे क्रमांक लागतो. मात्र, वॉनच्या मते न्यूझीलंड आणि इंग्लंड यांना कसोटी क्रमवारीत मिळाळेले अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान योग्य नाही. 

AUSvsNZ : तो डेड बॉल नव्हताच, म्हणत स्मिथ गेला पंचांच्या अंगावर धाऊन 

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी गेल्या दोन वर्षांत जास्त कसोटी मालिका जिंकलेल्या नसल्यामुळे त्यांच्या क्रमवारीवर वॉन नाखूश आहे. ''मला कळत नाही न्यूझीलंडने गेल्या दोन वर्षांच्या काळात एवढ्या कसोटी कशी जिंकल्या? मात्र, त्यांचा दुसरा क्रमांक आणि इंग्लंडचा चौथा क्रमांक मला पटत नाही. इंग्लंडने गेल्या तीन चार वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये खूप जेमतेम कामगिरी केली आहे. परदेशात झालेल्या कसोटींत त्यांची खूप कसरत झाली आहे. इंग्लंडने मायदेशात मालिका जिंकली आहे. मायदेशात झालेली अॅशेस मालिकासुद्धा बरोबरीत सुटली होती. त्यांनी फक्त आयर्लंडविरुद्ध विजय मिळवला आहे त्यामुळे या क्रमवारीत काहीतरी गोंधळ असल्याचे मला वाटते,'' अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

सूर्यग्रहणाचा थेट परिणाम रणजी सामन्यांवर 

तसेच दुसरा क्रमांक मिळविण्याची न्यूझीलंडची पात्रता नसल्याचेही त्याने बोलून दाखवले. तो म्हणाला, ''माझ्या मते आंतरराष्ट्रीय क्रमवारीत न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर योग्य नाही. ऑस्ट्रेलिया खूप चांगला कसोटी संघ आहे त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर त्यांनी असायला हवं.''

ऑस्ट्रेलियाला आव्हान फक्त भारताचेच
''सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोनत संघ जगात सर्वोत्तम आहेत. सध्या भारत हा फक्त एकच संघ आहे जो ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात पराभूत करु शकतो. यापूर्वी जेव्हा भारत ऑस्ट्रेलियात आला तेव्हा कांगारुंच्या संघात स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांचा समावेश नव्हता. जेव्हा पुढील वर्षी भारत पुन्हा ऑस्ट्रेलियात येईल तेव्हा सगळे तंदुरुस्त असतील. भारताकडेसुद्धा चांगली वेगवान-फिरकी गोलंदाजी आहे, त्यांच्या फलंदाजांकडे अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाला मायदेशात फक्त भारतच आव्हान देऊ शकतो.'' 
 

loading image