
विकेट आणि धावांपेक्षा निर्धाव षटके टाकणारे गोलंदाज म्हणून बापू नाडकर्णी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होते.
मुंबई : जुन्या जमान्यातील कसोटीपटू आणि निर्धाव षटकांचे विक्रमवीर बापू नाडकर्णी (वय 87) यांचे शुक्रवारी (ता.17) मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. उद्या (शनिवारी, ता.18) शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नाशिकमध्ये जन्मलेल्या बापू नाडकर्णी यांचे पूर्ण नाव रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी असे होते. डावखुरे फिरकी गोलंदाज आणि भरवशाचे फलंदाज असा त्यांनी लौकिक मिळवला होता. 41 कसोटी सामन्यात त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात 88 विकेटस् त्यांनी मिळवल्या होत्या. तसेच एका शतकासह 1414 धावाही त्यांनी केल्या होत्या.
- INDvsAUS : टीम इंडियाचे 'जशास तसे उत्तर'; सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी!
1955-56 मध्ये दिल्लीतील फिरोजशा कोटला मैदानावर त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. विकेट आणि धावांपेक्षा निर्धाव षटके टाकणारे गोलंदाज म्हणून बापू नाडकर्णी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होते. 29 षटकातील सलग 21 आणि एकूण 26 षटके त्यांनी निर्धाव टाकली होती.
- साउथच्या 'या' क्यूट अभिनेत्रीच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा!
त्यात एकही विकेट मिळाली नसला तरी अवघ्या पाचच धावा दिलेल्या होत्या. 32-27-5-0 असे त्यांचे पृथःकरण होते. त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे. 12 जानेवारी 1964 रोजी इंग्लंडविरुद्ध मद्रास (आत्ताचे चेन्नई) येथील कसोटी सामन्यात बापू यांनी हा विक्रम केला होता.
- INDvsAUS : 'कमाल करते हो पांडेजी'; मनिषने एका हातात घेतलेला कॅच एकदा बघाच!
रणजी क्रिकेटमध्ये बापू नाडकर्णी यांनी सुरुवातीला 1951-52 ते 1959-60 या कालावधीत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर 1967-68 पर्यंत ते मुंबईकडून खेळले. सौराष्ट्रविरुद्धच्या एका सामन्यात त्यांनी नाबाद 201 आणि 17 धावांत सहा बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली होती.
BCCI mourns the sad demise of Bapu Nadkarni.
The 86-year-old breathed his last at his daughter’s residence in Mumbai on Friday. https://t.co/IKx9mpOTnB pic.twitter.com/ghxNAZKVpB
— BCCI (@BCCI) January 17, 2020