INDvsAUS : टीम इंडियाचे 'जशास तसे उत्तर'; सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी!

INDvsAUS-Team-India
INDvsAUS-Team-India

राजकोट : मुंबईतल्या पहिल्या सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर शुक्रवारी (ता.17) इथं झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियानं 37 रन्सनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि कॅरी यांना एकाच ओव्हरमध्ये आऊट करणारा कुलदीप यादव गेम चेंजर ठरला. 

स्मिथचा अडसर झाला दूर

भारताच्या 340 रन्सचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियानं चांगली सुरुवात केली होती. टीमच्या 20 रन्स असताना वॉर्नर आऊट झाला. पण त्यांच्या फिंच आणि लबुशेन यांनी डाव सावरला. लबूशेन, अॅलेक्स कॅरी आणि स्टिव्ह स्मिथ यांनी चिवट बॅटिंग करत टीम इंडियाला घाम फोडला होता. पण, हे तिघे आऊट झाल्यानंतर मॅच हळू हळू भारताच्या बाजूनं झुकली. त्यासाठी कुलदीप यादवची 38वी ओव्हर महत्त्वाची ठरली. त्यात कुलदीपनं पहिल्यांदा कॅरीला कोहली करवी कॅच आऊट केलं, तर त्यानंतर 98 वर खेळणाऱ्या स्मिथला बोल्ड केलं.

मॅचचा निकाल तिथच फिरला. टर्नर, किमिन्स, स्टार्क हे धोकादायक ठरू शकले असते. पण, टीम इंडियाच्या बॉलर्सनी त्यांचा जम बसू दिला नाही. बुमराह, शमी, सैनी यांनी ऑस्ट्रेलियाचं शेपूट गुंडाळलं आणि तीन मॅचच्या सिरीजमध्ये दुसरी मॅच जिंकून बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाच स्मिथ मैदानावर होता तोपर्यंत मॅच पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्याच हातात होती. स्मिथ मॅच फिरवणार असं वाटत असतानाच तो दुदैवानं 98 रन्सवर बोल्ड झाला टीम इंडियाच्या विजयाच्या मार्गातला मोठा अडसर दूर झाला. 

के.एल. राहुलचा धडाका

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कायमच चांगली कामगिरी करणाऱ्या शिखर धवननं आज 90 बॉल्समध्ये 96 रन्सची खेळी केली. त्यात त्यानं एक सिक्स आणि 13 बाऊंड्री मारल्या. भारताची पहिली विकेट रोहित शर्माच्या रुपानं 81वर गेली. शिखरला कॅप्टन विराट कोहलीनं चांगली साथ दिली. त्यांनी 97 रन्सची पार्टनरशीप केली.

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आला. मात्र, त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. पण, पाचव्या क्रमांकावर येत केएल राहुलनं 52 बॉल्समध्ये तडाखेबंद 80 रन्सची खेळी केल्यानंतर भारताचा स्कोअर 340 वर गेला. राहुलच 'मॅन ऑफ दी मॅच' ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com