
पांडेला फलंदाजीमध्ये काही कमाल आली नसली तरी त्याने ही कसर क्षेत्ररक्षणामध्ये भरून काढली.
राजकोट : येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या मनिष पांडेने घेतलेल्या नेत्रदीपक झेलची सध्या तुफान चर्चा रंगते आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर आणि तुफानी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या लौकिकाला साजेल अशी धडाक्यात सुरवात केली. मात्र, त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले.
WHAT. A. CATCH! #TeamIndia #INDvAUS pic.twitter.com/DyV8Vgtryy
— BCCI (@BCCI) January 17, 2020
- INDvsAUS : किंग कोहलीच्या नावावर जमा झाले तीन अनोखे कारनामे!
डावाच्या चौथ्या षटकात मोहमंद शमीला जोरदार फटका मारताना तो मनिष पांडेकडे झेल देत झेलबाद झाला. पांडेने हवेत उंच उडी मारत वॉर्नरचा सुरेख झेल टिपला. आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला.
Stretch and Catch it like @im_manishpandey
He goes full stretch to pluck a one-handed stunner to dismiss Warner. #TeamIndia #INDvAUS
Full video - https://t.co/UQ1Vm8KoGZ pic.twitter.com/QFyMzZSfut
— BCCI (@BCCI) January 17, 2020
तत्पूर्वी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारुंपुढे 340 धावांचा डोंगर उभारला. यामध्ये सलामीवीर शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि के. एल. राहुल यांच्या अर्धशतकी खेळींचा समावेश आहे.
- कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून हटविल्यानंतर धोनीचे 'बॅक टू बेसिक'!
शेवटची काही षटके शिल्लक असताना फलंदाजीसाठी मैदानात आल्यानंतर मनिष केवळ 2 धावा काढून परतला. मात्र, पांडेला फलंदाजीमध्ये काही कमाल आली नसली तरी त्याने ही कसर क्षेत्ररक्षणामध्ये भरून काढली.