'विराटच्या वागण्याचा मुलं काय आदर्श घेतील?' | Akash Chopra Slam Virat Kohli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akash Chopra Slam Virat Kohli
'विराटच्या वागण्याचा मुलं काय आदर्श घेतील?'

'विराटच्या वागण्याचा मुलं काय आदर्श घेतील?'

विराट कोहलीने (Virat Kohli) डीन एल्गरच्या DRS बाबत त्रागा करत स्टंप माईकमधून थर्ड अंपायरला सुनावले. याबाबतचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र विराटच्या या वागण्यावर अनेक माजी खेळाडूंनी (Former Indian Player) नाराजी व्यक्त केली आहे. समालोचन करताना या माजी खेळाडूंनी अशा घटना लगेचच बाजूला ठेवून खेळावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कारण या DRS प्रकरणानंतर भारतीय संघ थोडा विचलीत झाला होता. (Akash Chopra Slam Virat Kohli)

हेही वाचा: VIDEO : विराटनं DRS चा राग बॉल टॅम्परिंगकडे नेला; बघा काय घडलं

आर. अश्विनच्या (Ravichandran Ashwin) गोलंदाजीवर डीन एल्गर पायचीत झाला होता. त्यानंतर त्याने DRS घेतला. त्यात त्याला नाबाद ठरवण्यात आले. यानंतर विराटने (Virat) DRS बाबत नाराजी व्यक्त करत स्टंप माईकजवळ जात खरी खोटी सुनावली होती. स्टम्प माईकमध्ये तो फक्त विदेशी संघावर लक्ष ठेवून नका तर तुमच्या संघावरही लक्ष ठेवा असे म्हणताना सर्वांनी ऐकले.

हेही वाचा: DRS वर विराट भडकला, फिल्ड अंपायरची धक्कादायक रिअ‍ॅक्शन

याबाबत भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा (Akash Chopra) यांने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'तुम्ही भावनेच्या भरात वाद घालता, तुम्ही उघड्या डोळ्याने जो फलंदाज बाद आहे असं दिसतं आणि तो फलंदाज DRS नाबाद ठरवतो तर निराश होणारच. तो चेंडू नक्तीच स्टंपवर आदळला असता. नाबाद ठरवल्यानंतर डीन एल्गरचे (Dean Elgar) हावभाव पाहिले तर त्याच्या चेहऱ्यावर वाचलो असेच भाव होते. DRS हा आशेचा किरण म्हणून घेतला जातो तुम्हाला खात्री नसते की तुम्ही नाबादच आहात.'

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, 'तुम्हाला तुमचा आवाज उठवण्याचा हक्क आहे. मात्र योग्य मार्गाने. विराटच्या वागण्याबाबत मला शंका आहे. कारण मॉर्ने मॉर्कलने (Morne Morkel) हे लक्षात आणून दिले की हा सामना मोठ्या संख्येने लहान मुले (Kids Watching) देखील बघत आहेत. विराटच्या वागण्याने त्यांचे DRS आणि अंपायर बाबत नकारात्मक मत तयार होईल.'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top