"संघात ५ ओपनर कशाला हवेत?"; माजी क्रिकेटपटूचा तिखट सवाल | Team India Squad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Sharma-Team-India

IND vs NZ T20 Series | विराटनंतर रोहित झाला संघाचा नवा टी-२० कर्णधार

"संघात ५ ओपनर कशाला हवेत?"; माजी क्रिकेटपटूचा तिखट सवाल

sakal_logo
By
विराज भागवत

भारतीय संघाचा टी२० विश्वचषकातील प्रवास साखळी फेरीतच संपला. त्यासोबत टी२० कर्णधार म्हणून विराटचाही प्रवास संपला. न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी रोहित शर्माला संघाचा कर्णधार करण्यात आले आणि केएल राहुलला उपकर्णधारपद दिले गेले. अनेक युवा खेळाडूंनाही या मालिकेसाठी संघात संधी देण्यात आली. ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर यांसारख्या IPL स्टार्सना संधी मिळाली. तसेच, इशान किशन, सूर्यकुमार यादव यांसारखी फळीही निवडण्यात आली. या मुद्द्यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू निवड समितीवर चांगलाच संतापला.

Team India

Team India

हेही वाचा: T20 WC: भारत स्पर्धेबाहेर गेला; जाफरचं गमतीशीर ट्वीट व्हायरल

भारताच्या संघात रोहित शर्मा, लोकेश राहुल, इशान किशन हे तीन सलामीवीर होते. त्यातच नव्या संघात व्यंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. याबद्दल बोलताना माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा म्हणाला, "आपल्या संघनिवड प्रक्रियेमध्ये एक मोठी समस्या आहे. तुम्ही टी२० संघात जे खेळाडू निवडता, त्या खेळाडूंना कोणत्या आधारावर निवडता हे महत्त्वाचे आहे. ते ज्या क्रमांकावर खेळतात त्या क्रमांकासाठी त्यांची निवड केली जात नाही, हा मोठा मुद्दा आहे. संघात निवड करताना IPLच्या कामगिरीचा विचार केला जातो हे मान्य आहे. पण सलामीवीर म्हणून दमदार खेळ करणाऱ्यांना तुम्ही चौथ्या-पाचव्या-सहाव्या क्रमांकासाठी संघात स्थान देत आहात, हे कितपत योग्य आहे? एकाच संघात कर्णधार आणि उपकर्णधार ओपनर असताना पाच सलामीवीर संघाच काय करायचे आहेत?", असा तिखट सवाल त्याने केला.

IND-Rahul-Rohit

IND-Rahul-Rohit

हेही वाचा: रोहित कॅप्टन झाला रे! न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाची घोषणा

भारताचा न्यूझीलंड विरूद्धच्या टी२० मालिकेसाठी संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

loading image
go to top