'तुझ्यासारख्या महिलेवर बलात्कार झालाच पाहिजे'; महिला प्रशिक्षकाचा क्रीडा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप I Women Coach | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sports Minister Sandeep Singh

'एफआयआर दाखल झाल्यानंतर घरमालकानं मला त्रास देण्यास सुरुवात केली. घरमालकानं शिवीगाळ करत माझ्या घराला कुलूप लावलं.'

Women Coach : 'तुझ्यासारख्या महिलेवर बलात्कार झालाच पाहिजे'; महिला प्रशिक्षकाचा क्रीडा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

पंचकुला : हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह (Sports Minister Sandeep Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या ज्युनियर महिला प्रशिक्षकानं (Women's Junior Coach) आता क्रीडा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘तुझ्यासारख्या महिलेवर बलात्कार झालाच पाहिजे’, असं वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हंटल्याचा आरोप पीडित प्रशिक्षकानं केलाय. या गंभीर आरोपांसह पीडित महिला प्रशिक्षकानं क्रीडा विभागाच्या संचालकांकडं लेखी तक्रार केलीये. विविध मार्गानं छळ करून दबाव निर्माण केला जात असल्याचंही पीडित महिलेनं सांगितलं.

हेही वाचा: Nettaru Murder Case : 24 वर्षात भारताला इस्लामिक देश बनवण्याचा कट; NIA च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

पीडित ज्युनियर महिला प्रशिक्षकानं सांगितलं की, 'पोलिसांनी माझी अनेकदा चौकशी केलीये, पण यातून काहीच साध्य झालेलं नाहीये. माझा आता चंदीगड पोलिसांवरचा (Chandigarh Police) विश्वासही उडाला असून सरकार माझं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत करत आहे. मला न्याय मिळण्यासाठी मी कोर्टाची पायरीही चढायला तयार आहे.'

हेही वाचा: Hasan Mushrif : माझा जावई घोटाळ्यात आढळला, तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार - मुश्रीफ

महिला प्रशिक्षका पुढं म्हणाली, एफआयआर दाखल झाल्यानंतर घरमालकानं मला त्रास देण्यास सुरुवात केली. घरमालकानं शिवीगाळ करत माझ्या घराला कुलूप लावलं. माझ्या कार्यालयात आणि घरात दबाव निर्माण केला जात आहे. मी क्रीडा संचालनालयाकडं लेखी तक्रार केलीये. या प्रकरणी हरियाणाचे मुख्यमंत्री एक शब्दही बोलले नाहीत, असंही पीडितेनं म्हटलं.

हेही वाचा: Bageshwar Dham : 'बागेश्वर धाम'चे बाबा धीरेंद्र शास्त्री सापडले वादात, भाजप नेत्यानं का केलं त्यांचं समर्थन?

पीडित महिला म्हणाली, मला कोणतीही नवीन सुरक्षा देण्यात आलेली नाही. माझ्याकडं फक्त जुनी सुरक्षा आहे. क्रीडामंत्र्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांचा राजीनामाही घेण्यात आलेला नाही. हे प्रकरण घडून खूप दिवस झाले. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही, असंही त्यांनी नमूद केलं.