

Legendary Kabaddi Captain Tarak Raul Passes Away
Sakal
राष्ट्रीय खेळाडू ज्यांनी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय कबड्डी संघाचे नेतृत्व करणारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डीपटू तारक राऊळ यांचे आज, दि. ३ सप्टेंबर रोजी पहाटे ४.१५च्या सुमारास निधन झाले.
गेले काही दिवस ते आजाराशी सामना करत होते. २ जून रोजी त्यांनी ७५व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी तृप्ती, श्रेयस व शृंगार अशी दोन मुले आणि सुना असा परिवार आहे. तारक ना. म. जोशी मार्ग येथील आल्हाद सेवा मंडळाचे खेळाडू. सुरुवातीच्या करकीर्दीत रिझर्व्ह बँक व्यावसायिक संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. नंतर त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा संघाकडून मैदाने गाजवली.