esakal | शोएबच्या संघात विराटला स्थान नाही, चार भारतीयांना दिली संधी
sakal

बोलून बातमी शोधा

शोएबच्या संघात विराटला स्थान नाही, चार भारतीयांना दिली संधी

शोएबच्या संघात विराटला स्थान नाही, चार भारतीयांना दिली संधी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपला सर्वकालीन एकदिवसीय संघ निवडला आहे. यामध्ये विराट कोहली, रिकी पाँटिंग, संगाकारा, मॅग्राथ आणि ब्रायन लारा यासारख्या दिग्गज खेळाडूंना संघात स्थान दिलं नाही. चकीत करणारी गोष्ट म्हणजे, शोएबच्या संघाचा कर्णधार एक फिरकी गोलंदाज आहे.

शोएबने आपल्या संघात विराट कोहलीला स्थान दिलेलं नाही. तरिही शोएबच्या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. शोएबच्या संघात चार पाकिस्थानी खेळाडूंचाही समावेश आहे. सचिन तेंडुलकर आणि गॉर्डन ग्रीनिज यांच्यावर शोएबने सलामीची जबाबदारी सोपवली आहे. तर इंजमाम उल हक आणि सईद अनवर यांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील जबाबदारी सोपवली आली आहे.

हेही वाचा: ...त्याला स्वार्थासाठी कुणी नख लावू नये; कोल्हेंचं प्रत्युत्तर

शोएबनं आपल्या संघात फक्त तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. यामधील दोन खेळाडू पाकिस्तान संघातील आहे. वसीम अकरम, वकार यूनुस यांना शोएबने संधी दिली आहे. तर कपिल देव आणि युवराज यांना अष्टपैलू म्हणून संघात स्थान दिलं आहे.

शोएबचा सर्वकालिन एकदिवसीय संघ -

गॉर्डन ग्रीनिज, सचिन तेंदलुकर, इंजमाम उल हक, सईद अनवर, एमएस धोनी, एडम गिलक्रिस्ट, युवराज सिंह, वसीम अकरम, वकार यूनुस, कपिल देव, शेन वॉर्न (कर्णधार)

loading image