esakal | ...त्याला स्वार्थासाठी कुणी नख लावू नये; कोल्हेंचं प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अमोल कोल्हे.

...त्याला स्वार्थासाठी कुणी नख लावू नये; कोल्हेंचं प्रत्युत्तर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांच्या श्रेयांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष उफाळून आला. आजी-माजी खासदारांनी टोकाच्या भूमिका घेत टीकास्त्र सोडलं होतं. आता अमोल कोल्हे यांन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली येथे वृत्तवाहिनीसोबत बोलताना अमोल कोल्हे यांनी स्थानिक पातळीवर भांड्याला भांडं लागणार अशी भूमिका घेतली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, त्या विधनाबाबत चर्चा घडवून आणण्यामागे वेगळा हेतू आहे.

महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी मिळून सरकार बनवलंय, त्याला स्वार्थासाठी कुणी नख लावू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सरकार व्यवस्तित काम करत आहे. मात्र, स्वार्थासाठी याला कुणीही नख लावू नये, असं अमोल कोल्हे म्हणाले. माणूस ज्या भाषेत टीक करतो, त्यातून त्याची संस्कृती कळते, त्यामुळे वैयक्तिक बाबींवर टीका करण्यात मला स्वारस्य नाही. कारण, माझ्या शिरुर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, जनतेशी कटिबद्ध आहे. मतदारसंघातल्या विकासकामांबद्दल जनतेला माहिती आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक करुन अकारण माझ्या शिरुर मतदारसंघाचं नाव वेगळ्या आणि चुकीच्या कारणासाठी चर्चेत आणणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेवर कुठलंही उत्तर द्यायची मला आवश्यकता भासत नाही. असं म्हणते अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिलं.

हेही वाचा: कोणी कोणाशीही हातमिळवणी केली तरी शिवसेना सक्षमच!

वाद कसा सुरु झाला?

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव व खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १७) करण्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यापूर्वीच शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी आढळराव पाटील यांनी या कामाचे उद्‍घाटन केले. त्यावेळी त्यांनी व उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याववर टीका केली. येथूनच अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यात राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडाल्या.

हेही वाचा: पवार-मोदी भेटीमुळे काँग्रेस बॅकफूटवर; नव्या समीकरणाची चर्चा

तेव्हा काय म्हणाले अमोल कोल्हे?

‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने सुरू केलेले शिवसंपर्क अभियान हे पक्षवाढीसाठी नसून, फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकासआघाडी राहिली नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्यांच्यावर शरद पवार यांचा वरदहस्त आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे,’’ अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शिवसैनिकांना सुनावले होते.

हेही वाचा: भाजप नेत्यांविरुद्ध मुख्यमंत्री ठाकरेंची नरेंद्र मोदींना गळ

आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर पलटवार -

थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय? अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहेत. मी म्हातारा असलो, तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. समज आहे. यांच्यासारखा नटसम्राट नाही”, अशा शब्दात आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय

काँग्रेसमुळे सत्तेत आहात विसरु नका -

“खासदार अमोल कोल्हे म्हणतात पवार साहेबांमुळे (Sharad Pawar) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेना म्हणते आमच्या सहकार्याने राष्ट्रवादी सत्तेत, पण कृपा करुन दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका, काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात. तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी” असं ट्वीट डॉ. राजू वाघमारे यांनी केलं आहे.

loading image