माजी क्रिकेटर अन् DSP जाडेजा यांचे कोरोनाने निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambapratasinh Jadeja dies of COVID-19 infection

माजी क्रिकेटर अन् DSP जाडेजा यांचे कोरोनाने निधन

राजकोट : भारतीय क्रिकेट जगताला कोरोनाने हादूरन सोडलं आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अंबाप्रतासिंहजी जाडेजा (Ambapratasinh Jadeja) यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. ते 69 वर्षांचे होते. सौराष्ट्र क्रिकेट संघ (SCA) ने या वृत्ताची पुष्टी केली आहे.

सौराष्ट्र क्रिकेट संघाने (SCA) यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. 'सौराष्ट्र क्रिकेट संघाशी संलग्नित प्रत्येकाला माजी क्रिकेटर अंबाप्रतापसिंहजी जाडेजा (Ambapratasinh Jadeja) यांच्या अचानक निघून जाण्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. अखेर त्यांचा ही झुंज आज अपयशी ठरली. वलसाड येथे त्यांचे निधन झाले. मुळचे जामनगरचे रहिवाशी असलेले अंबाप्रतापसिंहजी जाडेजा मध्यम गती जलदगती गोलंदाज होते. त्यांनी सौराष्ट्र संघाकडून रणजी ट्रॉफीत आठ सामने खेळले होते. ते गुजरातचे निवृत्त पोलीस उपाधीक्षकही होते. जाडेजा यांनी 8 रणजी सामन्यात 11.11 च्या सरासरीनं 100 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्यांनी 17 च्या सरसरीने 10 विकेट घेतल्या होत्या.

हेही वाचा: पंतच्या वादग्रस्त कॅचवर गावसकरांची 'कडक' रिअ‍ॅक्शन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी सचिव निरंजन शाह यांनीही जाडेजा यांच्या निधवानवर शोक व्यक्त केलाय. 'अंबप्रतापसिंहजी एक उत्तम खेळाडू होते. त्यांच्यासोबत क्रिकेटवर अनेकदा सर्वोत्तम चर्चा व्हायची. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशा शब्दात निरंजन शाह यांनी दुख: व्यक्त केले आहे.

हेही वाचा: RSAvsIND Live: जोडी ब्रेकर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह

मागील वर्षी राजस्थानकडून स्थानिग क्रिकेट खेळलेल्या 36 वर्षीय लेग स्पिनर विवेक यादव (Vivek Yadav) यांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला होता. विवेक यांनी जयपूरच्या हॉस्पिटलमध्ये 5 मे 2021 अखेरचा श्वास घेतला होता. विवेक 2010-11 आणि 2011-12 या हंगामात रणजी ट्रॉफी उंचावणाऱ्या संघाचे सदस्य होते. त्यांच्या नंतर आता आणखी एका क्रिकेटरने कोरोनामुळे जीव गमावला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketCovid 19 Cases
loading image
go to top