पंतच्या वादग्रस्त कॅचवर गावसकरांची 'कडक' रिअ‍ॅक्शन | Rishabh Pant Controversial Catch Sunil Gavaskar Reaction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant Catch Controversy
पंतच्या वादग्रस्त कॅचवर गावसकरांची 'कडक' रिअ‍ॅक्शन

पंतच्या वादग्रस्त कॅचवर गावसकरांची 'कडक' रिअ‍ॅक्शन

जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिका (RSAvsIND 2nd Test) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर आणि पिटरसन यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र शार्दुल ठाकूरने दक्षिण आफ्रिकेला पाठोपाठ धक्के देण्यास सुरुवात केली. त्याने कर्णधार एल्गरला २८ तर पिटरसनला ६२ धावांवर बाद करत सेट जोडी फोडली. त्यानंतर लंचच्या आधी त्याने डुसेनला ऋषभ पंत (Rishabh Pant) करवी (Rassie van der Dussen) झेल बाद करत लंचपूर्वीच आफ्रिकेची अवस्था ४ बाद १०२ धावा अशी केली. (Rishabh Pant l Catch Controversy)

हेही वाचा: Video: बांगलादेशने कहरच केला! असा DRS कोण घेतो का?

मात्र ऋषभ पंतने डुसेनचा पकडलेला कॅच वादग्रस्त ठरला. ज्यावेळी या विकेटचा रिप्ले पाहण्यात आला त्यावेळी चेंडू पंतच्या ग्लोजमध्ये विसावण्यापूर्वी त्याचा मैदानाला स्पर्श झाला होता. मात्र डुसेनला या रिप्लेचा काहीच फायदा झाला नाही. कारण त्याने याबाबत कोणतीच अपील केली नव्हती. ज्यावेळी रिप्ले दाखवण्यात आला त्यावेळी तो बाऊंडरी लाईनच्या बाहेर गेला होता.

हेही वाचा: RSAvsIND Live: जोडी ब्रेकर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह

पंतच्या या वादग्रस्त कॅचची चर्चा समालोचन कक्षातही झाली. या विकेटवर अनेक समालोचकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र सुनिल गावसकर यांनी एक कडक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जर फलंदाजाला या कॅचबाबत जराशी जरी शंका होती तर तो खेळपट्टीवर थांबला का नाही त्याने या विरुद्ध अपील करायला हवी होती.

Web Title: Rishabh Pant Took Rassie Van Der Dussens Controversial Catch Sunil Gavaskar Reaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top