मंत्र गमावलेल्या फ्रान्सला तंत्रज्ञानाने तारले रिप्लेनंतर पहिल्या ऐतिहासिक पेनल्टीवर ग्रीझ्मनचा गोल

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

...आणि रिप्लेचा इशारा 
पूर्वार्धातील नीरस खेळानंतर उत्तरार्धात दहाव्या मिनिटाला नाट्य घडले. ऑस्ट्रेलियाच्या जॉशुआ रिड्‌सन याने पेनल्टी क्षेत्रात मैदानावर झेपावत पाय टाकून ग्रीझ्मनला पाडले. त्यानंतर पंचांनी क्षणार्धात रिप्लेचा इशारा केला. व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) कार्यान्वित झाले. त्यात जॉशुआ याचा पाय ग्रीझ्मनच्या टाचेला लागल्याचे दिसून आले. त्यामुळे पंचांनी पेनल्टी किकचा कौल दिला. 

कझान - संभाव्य विजेत्यांमध्ये गणना झालेले फ्रान्स सलामीच्या सामन्यात तंत्रज्ञानामुळे तरले. विश्वकरंडक फुटबॉलच्या इतिहासात रिप्लेवर झालेला पहिला निर्णय फ्रान्सकरिता फलदायी ठरला. हुकमी स्ट्रायकर अँटोईन ग्रीझ्मन याने ऐतिहासिक निर्णयानंतर पेनल्टीवर गोल केला. क गटात ऑस्ट्रेलियाचा चिवट प्रतिकार मोडून काढत फ्रान्सने 2-1 असा निसटता विजय मिळविला. 

कझान एरिनावरील सामन्यात ग्रीझ्मन-किलीयन एम्बापे आणि उस्माने डेम्बेले या आघाडी फळीतील त्रिकुटाच्या खेळात जान नव्हती. सॉकेरूजच्या चिवट खेळामुळे मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. पहिल्या सहा मिनिटांत फ्रान्सने तीन संधी दवडल्या. 

...आणि रिप्लेचा इशारा 
पूर्वार्धातील नीरस खेळानंतर उत्तरार्धात दहाव्या मिनिटाला नाट्य घडले. ऑस्ट्रेलियाच्या जॉशुआ रिड्‌सन याने पेनल्टी क्षेत्रात मैदानावर झेपावत पाय टाकून ग्रीझ्मनला पाडले. त्यानंतर पंचांनी क्षणार्धात रिप्लेचा इशारा केला. व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) कार्यान्वित झाले. त्यात जॉशुआ याचा पाय ग्रीझ्मनच्या टाचेला लागल्याचे दिसून आले. त्यामुळे पंचांनी पेनल्टी किकचा कौल दिला. 

या गोलनंतर ऑस्ट्रेलियाने चार मिनिटांत बरोबरी साधली. हा गोल पेनल्टीवरच झाला. फ्रान्सच्या सॅम्युएल उमटिटी याने पेनल्टी क्षेत्रात चेंडू हाताळला. मुयने फ्री-किकवर मारलेल्या चेंडूच्या मार्गातून तो हात बाजूला नेऊ शकला नाही. त्यामुळे मिळालेली पेनल्टी मिले जेडिनॅक याने सत्कारणी लावली. सॉकेरूजने बरोबरीनंतर टिच्चून खेळ केला. अखेर दहा मिनिटे बाकी असताना पॉल पोग्बा याने गोल केला. 

Web Title: France beat Australia 2-1