
फ्रेंच ओपन २०२५ स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद स्पेनच्या कार्लोस अल्काराजने जिंकले. त्याने हे विजेतेपद जिंकत सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन आपल्या नावावर केले आहे. २२ वर्षांच्या अल्काराजने अक्षरश: पराभवाचा दाढेतून सामना खेचून आला आणि पाचवे ग्रँडस्लॅम जिंकले आहे.
ऐतिहासिक ठरलेल्या या अंतिम सामन्यात त्याने इटलीच्या यानिक सिन्नरला ५ सेटमध्ये पराभूत केले. या सामन्यात दुसऱ्या मानांकित अल्काराजने ४-६, ६-७ (४-७), ६-४, ७-६ (७-३), ७-६ (१०-२) अशा फरकाने ५ सेटमध्ये सामना जिंकला.