French Open : फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा गुरुवारचा दिवस संमिश्र यशाचा ठरला.
french open badminton tournament pv sindhu in the women singles quarterfinals
french open badminton tournament pv sindhu in the women singles quarterfinals Sakal

पॅरिस (फ्रान्स) : भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा गुरुवारचा दिवस संमिश्र यशाचा ठरला. एकीकडे शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिने महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असतानाच दुसरीकडे मात्र पुरुषांच्या एकेरीत आशा उंचावणाऱ्या किदांबी श्रीकांत याला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले.

पी. व्ही. सिंधू हिने बी. डब्ल्यू. झँग हिचे कडवे आव्हान तीन गेममध्ये परतवून लावले. झँग हिने पहिला गेम २१-१३ असा जिंकत आघाडी मिळवली. मात्र त्यानंतर सिंधू हिने झोकात पुनरागमन केले. भारताच्या फुलराणीने दुसऱ्या गेममध्ये २१-१० असे यश संपादन केले.अखेरच्या गेममध्ये सिंधूने आपला खेळ उंचावला आणि २१-१४ अशी बाजी मारली. या विजयासह सिंधूने या स्पर्धेत पुढे पाऊल टाकले.

पहिल्या गेमनंतर घसरण

किदांबी श्रीकांत - लू ग्वांग झू यांच्यामध्ये गुरुवारी लढत रंगली. श्रीकांत याने पहिला गेम २१-१९ असा जिंकत आघाडी घेतली. दबावाखाली श्रीकांतने खेळ उंचावला व गेम आपल्या नावावर केला. त्यानंतर लू झू याने दुसऱ्या गेममध्ये २१-१२ असे यश संपादन करीत बरोबरी साधली. अखेरच्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. मात्र लू झू याने निर्णायक क्षणी चुका टाळल्या.अखेर श्रीकांतला २०-२२ असे पराभूत व्हावे लागले. पहिला गेम जिंकल्यानंतरही श्रीकांतचा पराभव झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com