
पॅरिस : फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधील पुरुषांच्या एकेरीत उद्या (ता. ८) दोन अव्वल टेनिसपटूंमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. अव्वल मानांकित इटलीचा यानिक सिनर व गतविजेता, दुसरा मानांकित स्पेनचा कार्लोस अल्काराझ यांच्यामध्ये झळाळता करंडक पटकावण्यासाठी चुरस लागणार आहे.