french open ons jabeur first african to reach 4 grand slams quarter finals
french open ons jabeur first african to reach 4 grand slams quarter finalssakal

The French Open : जॅब्यूएरची पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत धडक

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : अमेरिकेच्या बर्नाडा पेरा हिच्यावर विजय

पॅरिस : ट्युनिशियाच्या ओन्स जॅब्यूएर हिने फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच खेप. जॅब्यूएर हिने अमेरिकेच्या बर्नार्डा पेरा हिला ६-३, ६-१ असे पराभूत करून महिला एकेरीत आगेकूच केली.

जॅब्यूएर हिला अद्याप एकाही ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. मागील वर्षी तिने विम्बल्डन व अमेरिकन या दोन ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण तिला दोन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

french open ons jabeur first african to reach 4 grand slams quarter finals
French Open 2023 : बॉल गर्ल 15 मिनिटं रडली अन् खेळाडू झाले अपात्र; ग्रँडस्लॅम स्पर्धेत घडला अजब प्रकार

तसेच ऑस्ट्रेलियन ओपन व फ्रेंच ओपन या दोन्ही ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी तिने एक वेळा गाठली आहे. जॅब्यूएर - पेरा यांच्यामध्ये २०१९ मधील ग्वांझू येथे झालेल्या हार्डकोर्टवरील लढतीत पेरा हिने विजय मिळवला होता. पण फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये जॅब्यूएरच्या जबरदस्त खेळासमोर पेरा हिचा निभाव लागला नाही. ट्युनिशियाच्या खेळाडूने सहज विजय साकारला.

french open ons jabeur first african to reach 4 grand slams quarter finals
French Open 2023: आजारपणामुळे रायबाकिनाची तिसऱ्या फेरीतून माघार

त्सित्सिपास, अल्काराझचे विजय

पुरुषांच्या एकेरीमध्ये रविवारी मध्यरात्री स्टेफानोस त्सित्सिपास व कार्लोस अल्काराझ या स्टार टेनिसपटूंनी विजय संपादन करीत आगेकूच केली. स्टेफानोस याने सेबॅस्टीयन ऑफनर याचे आव्हान ७-५, ६-३, ६-० असे संपुष्टात आणले. अल्काराझ याने लोरेंझो मुसेटी याला ६-३, ६-२, ६-२ असे पराभूत केले.

रूडची विजयी वाटचाल

नॉर्वेच्या कॅस्पर रुड याने सोमवारी पुरुषांच्या एकेरीत विजयी वाटचाल कायम ठेवली. रूड याने निकोलस जॅरी याच्यावर सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com