jannik sinner
jannik sinnersakal

French Open Tennis Competition : जान्निक सिन्नरचा सहज विजय; अल्काराझचीही विजयी सलामी

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला इटलीचा जान जान्निक सिन्नर दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला दिसून येत आहे.
Published on

पॅरिस - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला इटलीचा जान जान्निक सिन्नर दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला दिसून येत आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत त्याने आपल्या पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ख्रिस्तोपर युबँक्स याचा ६-३, ६-३, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव केला.

ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजेत्या सिन्नरने माद्रिद ओपनमधून माघार घेतली होती, तसेच रोम मास्टर्स स्पर्धेतही तो मांडीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. रोलँड गॅरोसवर मात्र त्याने यशस्वी पुनरागमन केले आहे. मांडी आता व्यवस्थित आहे.

माझ्या टीमने मी तंदुरुस्त होण्यासाठी फार मेहनत घेतली. मी लवकरात लवकर कोर्टवर येण्यासाठी त्यांचे प्रयत्न मोठे होते. अजून १०० टक्के लय मिळाली नसली तरी प्रत्येक सामन्यागणिक आत्मविश्वास वाढेल, असे सिन्नरने सांगितले.

सिन्नरने पहिल्या सेटमध्ये युबँक्सच्या दोन सर्व्हिस भेदल्या आणि ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिन्नरला स्वतःची सर्व्हिस राखता आली नसती तरी पहिला सेट ६-३ असा जिंकणे त्याला कठीण गेले नाही.

मुळात कोर्टवर येण्याचा आनंद फार वेगळा आहे. प्रत्येक गेमनुसार आत्मविश्वास वाढत गेला, दुखापतीचा विसर पडत गेला आणि खेळातही सुधारणा होत गेली, असे त्याने विजयानंतर सांगितले.

दुखापतीचा सामना करत असलेल्या कार्लोस अल्काराझने आंद्रे रुब्लेव आणि हुबर्ट हुर्काझ यांच्यासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. प्रत्येक ग्रँड स्लॅममध्ये अल्काराझकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात असते; परंतु त्याला फोरआर्मच्या दुखापतीचा त्रास आहे. त्यामुळे या फ्रेंच ओपन स्पर्धेपूर्वीच्या काही स्पर्धांमधून त्याने माघार घेतली होती. पहिल्या फेरीत त्याने जेस्पर डी जाँग याचा ६-१, ६-२, ६-१ असा पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.