Mexico striker Raúl Jiménez
esakal
Raul Jimenez incredible comeback story before FIFA World Cup 2026: जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेला, म्हणजेच फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्याचा उद्घाटन सोहळाही भव्य झाला. सहयजमान मेक्सिकोने उद्घाटनीय सामन्यात २-० अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. यजमानांनी विजयी जल्लोष केला, परंतु या विजयाला एक भावनिक किनार होती. मेक्सिकोच्या रॉल जिमेनेझ ( ६७ मि.) व ज्युलियन क्विनोनेस ( ९ मि.) यांनी गोल केले. या गोलनंतर जिमेनेझ याच्या डोळ्यांत अश्रू तरळले.. मृत्यूला पराभूत करून तो हा वर्ल्ड कप खेळायला मैदानावर उतरला होता आणि पहिल्याच सामन्यात गोल करताच त्याने भावनांना वाट मोकळी केली.