Luka Modric Inspirational Journey: बाल्कन युद्धात फुटबॉल शिकलेला योद्धा! लुका मॉड्रिचचा वर्ल्ड कप प्रवास संपुष्टात; जिद्द अन् चिकाटीची अविस्मरणीय गाथा...

Luka Modrić's Unforgettable Football Story: फिफा वर्ल्ड कप २०२६मध्ये क्रोएशियाचा प्रवास संपला आणि त्याचबरोबर लुका मॉड्रिचच्या वर्ल्ड कप कारकिर्दीवरही पडदा पडला. मात्र हा शेवट केवळ एका महान फुटबॉलपटूचा नाही, तर संकटांवर मात करून जग जिंकणाऱ्या एका प्रेरणादायी योद्ध्याच्या कहाणीचा आहे.
Luka Modrić Extraordinary Journey of Courage and Glory

Luka Modrić Extraordinary Journey of Courage and Glory

esakal

Updated on

Luka Modrić Extraordinary Journey of Courage and Glory : बॉम्ब अन् बंदुकीच्या गोळ्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात ज्याच बालपण गेलं... युद्धामुळे राहतं घर सोडून निर्वासितांच्या हॉटेलमध्ये रहावे लागले... डोळ्यांदेखत आजोबांच्या शरीरावर गोळ्यांचे वार झालेले पाहिले... या परिस्थितीतही तो खचला नाही... जिद्द आणि चिकाटीची एक अविस्मरणीय गाथा त्याने लिहिली; अशा या खेळाडूला फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतून निरोप देताना जगातील महान फुटबॉलपटूपैकी एक ख्रिस्तियानो रोनाल्डोही भावनिक झालेला आज पाहायला मिळाला. पोर्तुगाल-क्रोएशिया हा सामना जय-पराजयाच्या पलिकडे अत्यंत महत्त्वाचा होता..या सामन्यात दोन दिग्गज रोनाल्डो आणि लुका मॉड्रिच हे समोरासमोर आलेले आणि हा पराभव या दोघांपैकी एकाचा प्रवास संपुष्टात आणणारा ठरणारा होता.. हे दुःख मॉड्रिचच्या वाट्याला आले, परंतु त्याची यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी ठरलीय...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com