Luka Modrić Extraordinary Journey of Courage and Glory
esakal
Luka Modrić Extraordinary Journey of Courage and Glory : बॉम्ब अन् बंदुकीच्या गोळ्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात ज्याच बालपण गेलं... युद्धामुळे राहतं घर सोडून निर्वासितांच्या हॉटेलमध्ये रहावे लागले... डोळ्यांदेखत आजोबांच्या शरीरावर गोळ्यांचे वार झालेले पाहिले... या परिस्थितीतही तो खचला नाही... जिद्द आणि चिकाटीची एक अविस्मरणीय गाथा त्याने लिहिली; अशा या खेळाडूला फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतून निरोप देताना जगातील महान फुटबॉलपटूपैकी एक ख्रिस्तियानो रोनाल्डोही भावनिक झालेला आज पाहायला मिळाला. पोर्तुगाल-क्रोएशिया हा सामना जय-पराजयाच्या पलिकडे अत्यंत महत्त्वाचा होता..या सामन्यात दोन दिग्गज रोनाल्डो आणि लुका मॉड्रिच हे समोरासमोर आलेले आणि हा पराभव या दोघांपैकी एकाचा प्रवास संपुष्टात आणणारा ठरणारा होता.. हे दुःख मॉड्रिचच्या वाट्याला आले, परंतु त्याची यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी ठरलीय...