IND vs SL: गौतम पुन्हा 'गंभीर'रित्या विराट कोहलीवर बरसला! 'शतक ठोकणे चांगले, पण ...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gautam gambhir again taunts virat kohli

IND vs SL: गौतम पुन्हा 'गंभीर'रित्या विराट कोहलीवर बरसला! 'शतक ठोकणे चांगले, पण...'

Gautam Gambhir and Virat Kohli : टीम इंडियाने कोलकाता येथे मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर चार गडी राखून विजय मिळवत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. केएल राहुलने भारताकडून नाबाद 64 धावा केल्या, ज्यामुळे भारताने 43.2 षटकात 216 धावांचे लक्ष्य पार केले. भारताने पहिल्या वनडेत 67 धावांनी दणदणीत विजय नोंदवला होता. कोहलीने चमक दाखवली आणि 87 चेंडूत 113 धावा करत 45 वे वनडे शतक झळकावले.

हेही वाचा: Prithvi Shaw: 'तुला जर निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर...'; गावसकरांनी शॉ दिला सल्ला

कोहलीचे हे 73वे आंतरराष्ट्रीय शतक आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सलग दुसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्ध 113 धावा केल्या होत्या. मात्र भारताने बांगलादेशविरुद्धची मालिका 2-1ने गमावली होती. आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पुन्हा एकदा कोहलीला टोला लगावला आहे.

हेही वाचा: IPL आता फुकटात! Jio च्या 'या' प्लॅनमुळे Hotstar चे किती होणार नुकसान ?

भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांच्यासह अनेक तज्ञ गुरुवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कोहलीच्या अलीकडील सामन्यातील कामगिरीबद्दल बोलत होते. गंभीर म्हणाला की कोहलीचे लक्ष 'वैयक्तिक कामगिरी'पेक्षा सामूहिक कामगिरीवर असायला हवे. कराण बांगलादेशविरुद्धची शेवटची वनडे मालिका भारताने गमावली होती हे आपण विसरू नये.

पुढे बोलताना गंभीर म्हणाला की, वैयक्तिक प्रतिभा महत्त्वाची आहे, वैयक्तिक शतके महत्त्वाची आहेत, जेव्हा तुमच्या रेकॉर्डचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही 50 शतके केलीत किंवा 100 केलीत हे खूप छान वाटते, पण बांगलादेशमध्ये जे घडले ते तुम्ही कधीही विसरू नये. कारण हा एक मोठा धडा आहे. बांगलादेशमध्ये सर्व स्टार्सच्या उपस्थितीत आपण हरलो होतो. केवळ या मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तिथून काहीतरी शिकले पाहिजे, असे मला वाटते. भूतकाळात जे घडले ते विसरता कामा नये.

हेही वाचा: IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! रात्री उशिरा 'या' दिग्गजाची बिघडली तब्येत

गुरुवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली चार धावा काढून बाद झाला. त्याला लाहिरू कुमाराने बोल्ड केले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना रविवारी तिरुअनंतपुरम येथे होणार आहे.