Gautam Gambhir : अत्यंत सुमार दर्जाचं नेतृत्व... गंभीर पुन्हा गरजला, कोणावर साधला निशाणा?

Gautam Gambhir
Gautam Gambhiresakal

Gautam Gambhir : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची आशिया कपदरम्यान अनेक वक्तव्य चर्चेचा विषय ठरली आहेत. आता गौतम गंभीरने आशिया कपचे दोन्ही फायनलिस्ट ठरल्यानंतर पुन्हा एकदा एक स्फोटक वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान - श्रीलंका यांच्यातील सामन्यानंतर गौतम गंभीरने बाबर आझमच्या नेतृत्वात सडकून टिका केली.

Gautam Gambhir
IND vs BAN : बांगलादेशची शेपूट वळवळली; भारतासमोर ठेवलं तगडं आव्हान

स्टार स्पोट्सवरील एका कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, 'मला विचाराल तर ही अत्यंत सुमार दर्जाची कॅप्टन्सी आहे. झमान खानच्या षटकात मिड ऑफवरून चौकार मारण्यात आला. शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर मिड ऑफवरून चौकार मारला. हे दोन्ही चेंडू संथ गतीने टाकले होते.'

'जर तुम्हाला संथ गतीने चेंडू टाकायचा असेल तर मिड ऑफचा आणि लाँग ऑफचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर असायला हवा. तुम्ही थर्ड मॅन सर्कलमध्ये घेऊ शकता. ही साधी कॅप्टन्सी आहे. विचार करा जर श्रीलंकेला शेवटच्या षटकात 13 धावा करण्याची गरज असती तर त्यांना ते जड गेलं असतं.'

Gautam Gambhir
Mohammed Shami : तो आला अन् त्यानं जिंकलं.... संधीची वाट पाहत बेंचवर बसला; आता शमीचा तो Video होतोय व्हायरल

गंभीर पुढे म्हणाला की, 'तुम्ही सामना हातून निसटू दिला. तुम्हाला तुमच्या सहाव्या गोलंदाजाचा कोटा पूर्ण करायचा होता. अशा प्रकारे गोष्टी होत नाहीत. ज्यावेळी कुसल मेंडिस आणि सदीरा मरविक्रमा यांच्यात भागीदारी होत होती त्यावेळी तुम्ही तुमचा प्रमुख गोलंदाज गोलंदाजी करणे आणि विकेट घेणे अपेक्षित होते.'

'पाकिस्तान हा सामना फक्त विकेट्स घेऊनच जिंकू शकत होता. श्रीलंकेने शेवटपर्यंत फलंदाजी केली. त्यांना सामना अधीच जिंकता आला असता. बाबर आझमने अजून चांगली कॅप्टन्सी करणे अपेक्षित आहे.'

श्रीलंकेकडून कुसल मेंडीसने 91 आणि चरिथ असलंकाने नाबाद 49 धावांची खेळी करत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. गतविजेत्या श्रीलंकेने आशिया कपची फायनल गाठली. आता त्यांचा मुकाबला 17 सप्टेंबरला भारतासोबत होणार आहे.

पावसामुळे डकवर्थ लुईस नुसार श्रीलंकेसमोर 42 षटकात 252 धावांचे आव्हान होते. हे आव्हान श्रीलंकेने शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात 8 विकेट्सच्या मोबदल्या पार केले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com