Gautam Gambhir Reaction | "तुझी बॅटिंग जरी चांगली असली तरीही..."; गंभीरचं रोखठोक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar-Yadav-Gautam-Gambhir

सूर्यकुमारला माजी सलामीवीराने दिला सूचक इशारा

"तुझी बॅटिंग जरी चांगली असली तरीही..."; गंभीरचं रोखठोक विधान

भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावापर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शेवटच्या षटकात विजय मिळवला. न्यूझीलंडकडून मार्टीन गप्टील आणि मार्क चॅपमॅन या दोघांनी अर्धशतके ठोकली. तर भारताकडून सूर्यकुमारने ६२ धावांची खेळी केली. त्याला त्याच्या खेळीसाठी सामनावीराचा किताब मिळाला. पण माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मात्र त्याला सुनावलं.

हेही वाचा: IND vs NZ: दीपक चहरच्या खुन्नसवर हरभजनची भन्नाट कमेंट

"सूर्यकुमार जरी चांगला फलंदाज असला तरी त्याने अशा परिस्थितीत सामने जिंकवूनच तंबूत परतायला हवे. जेव्हा आव्हान मोठं असतं त्यावेळी फलंदाजीला उतरल्यावर शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरून ठेवायला हवा. गोलंदाजांच्या माऱ्याचा समाचार घ्यायला हवा. क्रिकेटर म्हणून खेळायचं असेल तर शेवटच्या चेंडूपर्यंत धावा करता आल्या पाहिजेत. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमचे फलंदाज समोरील संघाच्या गोलंदाजांवर भारी पडणार आहेत, त्यावेळी बेधडकपणे फलंदाजी केली पाहिजे. पुढील ११ महिने आता संपूर्ण भारतीय संघाने हाच पवित्रा ठेवायला हवा", असं रोखठोक मत त्याने व्यक्त केलं.

हेही वाचा: IND vs NZ: T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

"सूर्यकुमार यादव चांगली फलंदाजी करत होता. पण त्याने बेजबाबदार फटका खेळला आणि तो बाद झाला याचं मला दु:ख आहे. संपूर्ण सामन्यात सूर्यकुमार दमदार फटकेबाजी करत होता, मग अशा वेळी त्याने संपूर्ण सामना संपवूनच तंबूत परत जायला हवं होतं. अशा सामन्यांमध्ये तुम्ही सुरूवात कशी करता यापेक्षा तुम्ही सामना संपवता कसा त्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. तुम्ही ६०,७० किंवा ८० धावा करत असला तरी त्यापेक्षा शेवटची धाव कोण काढतं यालाही तितकंच महत्त्व असतं", असं गौतम गंभीर म्हणाला.

loading image
go to top