Harbhajan Singh Funny Tweet | IND vs NZ: दीपक चहरच्या खुन्नसवर हरभजनची भन्नाट कमेंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harbhajan-Singh-Deepak-Chahar

चहरने न्यूझीलंडच्या गप्टीलला दिलेली खुन्नस तुफान चर्चेत

IND vs NZ: दीपक चहरच्या खुन्नसवर हरभजनची भन्नाट कमेंट

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ 1st T20 : भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते न्यूझीलंडला पराभूत केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. गप्टीलच्या ७० आणि चॅपमनच्या ६३ धावांच्या बळावर न्यूझीलंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. यास प्रत्युत्तर देताना सूर्यकुमार यादवच्या ६२ आणि रोहितच्या ४८ धावांच्या खेळीमुळे भारताना सामना जिंकला. या सामन्यात दीपक चहर आणि मार्टीन गप्टील यांच्यामधला खुन्नसच्या जुगलबंदीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्यावर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने भन्नाट कमेंट केली.

हेही वाचा: IND VS NZ T-20 : भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे

पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडकडून अनुभवी मार्टीन गप्टीलने चांगली खेळी केली. ४२ चेंडूत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार खेचत ७० धावांची खेळी केली. वेगवान गोलंदाज दीपक चहरला षटकार खेचल्यानंतर गप्टीलने त्याला एक नजर दिली होती. पण त्यानंतर गप्टीलला बाद केल्यानंतर दीपक चहरने त्याला जोरदार खुन्नस दिली. तो व्हिडीओ व्हारयल झाला.

हेही वाचा: Video: खुन्नसची जुगलबंदी... पाहा, नक्की कोण जिंकलं?

सामन्यातील लक्षवेधी क्षण म्हणून दीपक चहरला याबद्दल एक लाखांचं बक्षिस मिळालं. याबद्दल एका चाहत्याने लिहिलं की, दीपक चहरला त्या खुन्नससाठी एक लाखांचं बक्षिस मिळालं. त्यावर हरभजनने मजेशीर कमेंट केली. आमच्या वेळी अशा प्रकारचं काही असतं तर मी कोट्यधीश झालो असतो, असं हरभजन ट्वीट करत म्हणाला.

हरभजनची भन्नाट कमेंट-

हेही वाचा: IND vs NZ: राहुलने एक चौकार अन् एक षटकार लगावत रचला पराक्रम

दरम्यान, भारताच्या संघाकडून १६५ धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने ४८ धावा केल्या. त्याने ३६ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांच्या साथीने धावा जमवल्या. पण सूर्यकुमारने दमदार खेळ केला. त्याने ४० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिले.

loading image
go to top