Gautam Gambhir on Team India Fitness
esakal
Gautam Gambhir has emphasized the need for fitness improvement in Team India : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० मालिका विजयाचा पराक्रम केला असला तरी या संघातील खेळाडूंच्या तंदुरुस्तीत सुधारणा आवश्यक असल्याचे स्पष्ट मत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केले. पुढल्या वर्षी (२०२६) फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारत व श्रीलंका येथे टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर गौतम गंभीर बोलत होते. गौतम गंभीर यांनी ‘बीसीसीआय डॉट टीव्ही’ला मुलाखत देताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.