LIVE मॅच सुरु असतानाच स्टार बॉक्सरला आला हार्ट अटॅक; मुसा युमकचं रिंगमध्येच निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boxer Musa Yamak

तुर्कीच्या अधिकाऱ्यानंही स्टार बॉक्सरच्या मृत्यूला दुजोरा दिलाय.

LIVE मॅच सुरु असतानाच स्टार बॉक्सरला आला हार्ट अटॅक; मुसाचं रिंगमध्येच निधन

नवी दिल्ली : स्टार बॉक्सर मुसा यमकचा (Boxer Musa Yamak) हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. रिंगमध्ये अपराजित राहिलेला जर्मन बॉक्सर (German Boxer) मुसाच्या मृत्यूनं क्रीडा विश्व हादरलंय. त्याच्या आकस्मिक निधनानं सर्वांनाच धक्का बसलाय. मुसा हा 38 वर्षांचा होता. मुसा बॉक्सिंगमध्ये कधीच हार नाहीय, तो अपराजित होता. त्याचा रेकॉर्ड 8-0 असा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युगांडाच्या हमजा वांडेराविरुद्धच्या (Hamza Wandera) लढतीदरम्यान रिंगमध्ये मुसा अचानक बेशुध्द पडला.

तुर्कीच्या (Turkey) अधिकाऱ्यानंही स्टार बॉक्सरच्या मृत्यूला दुजोरा दिलाय. हसन तुरान म्हणाले, आशियाई आणि युरोपियन चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावणारा मुसा आता आमच्यात राहिला नाहीय. हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं लहान वयातच निधन झालंय. मुसाचा हा त्याच्या कारकिर्दीतील 9 वा व्यावसायिक सामना होता, असं त्यांनी नमूद केलंय.

दुसऱ्या फेरीत वांडेरासोबतच्या सामन्यात मुसाला मोठा फटका बसला. त्यानंतर तिसर्‍या फेरीत त्यानं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फेरी सुरू होण्यापूर्वी तो अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. त्यानंतर बॉक्सरला तत्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली, पण त्याला वाचवता आलं नाही. मुसानं 2017 मध्ये व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केलं आणि गेल्या वर्षी WBFed आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकल्यानंतर त्याला ओळख मिळाली.

टॅग्स :GermanyTurkey