
इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे.
BCCI चा मोठा निर्णय; IPL च्या अंतिम सामन्याच्या वेळेत बदल; 'हे' आहे कारण
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2022 चा (Indian Premier League) अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता हा सामना साडेसात ऐवजी रात्री आठ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. क्रिकबझच्या मते, आयपीएल समारोप समारंभामुळं अंतिम सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे.
सामना उशिरानं सुरु करण्याचं नेमकं कारण काय?
क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून (BCCI) आयपीएलमध्ये (IPL) पुन्हा एकदा ओपनिंग आणि क्लोजिंग शेरेमनी (उद्घाटन आणि समापन समारोह) आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. या हंगामात उद्घाटन समारंभाचं आयोजन करता आलं नाही. मात्र, यावेळी समापन समारोह आयोजित केला जाणार आहे. हा समारोहाची सुरुवात ६.३० वाजता सुरु होणार असून तो ५० मिनिटांचा असेल. समापन समारोह संपल्यानंतर नाणेफेक आणि अंतिम सामन्याला सुरुवात होईल. याच कारणामुळं आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशिरानं सुरु होणार आहे.
हेही वाचा: बॉडीगार्डशिवाय छोट्या कारमध्ये रतन टाटा; दिग्गज उद्योगपतीच्या साधेपणाचा Video Viral
दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या प्लेऑफमध्ये लखनऊ आणि गुजरात या संघांनी आपलं स्थान पक्कं केलंय. आणखी दोन संघाची प्लेऑफमध्ये निवड झाल्यानंतर एकूण चार संघांमध्ये प्लेऑफचे सामने खेळवले जातील. त्यानंतर टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.
Web Title: Change In Timing Of Ipl 2022 Final Match Will Start At 8 O Clock Bcci
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..