T20 Worldcup 2024: 'राहुल द्रविडला भारतरत्न पुरस्कार द्या..' या मराठमोळ्या दिग्गज खेळाडूने उठवला आवाज

Cricket News: कर्णधार असतांना इंग्लंडला जाऊन इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकणारा तो केवळ तिसरा भारतीय कर्णधार होता |
bharat ratna to rahul dravid
bharat ratna to rahul dravid sakal

Rahul Dravid: यंदा भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षानी वर्ल्डकप जिंकला.यावेळी संपुर्ण भारतात हा क्षण उत्सवासारखा साजरा करण्यात आला. संघ जेव्हा भारतात परतला तेव्हा तर भारतीयांनी त्यांच जंगी स्वागत केलं. या विजयाचे शिल्पकार वरेच जणजरी असले तरी कोच राहूल द्रविडचा वाटा हा यात खुप जास्त आहे. यामुळे त्याचे संपुर्ण देशात कौतूक केले जात आहे.

तर दुसरीकडे खेळाडूंचेही चांगलेच कौतुक लोक करत आहेत. बीसीसीआयने या सर्व खेळाडूंना १२५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या सर्व खेळाडूंची भेट घेतली. यातच आता या यशानंतर भारताचे माजी दिग्गड खेळाडू सुनिल गावस्करांनी मोठी मागणी केली आहे .

bharat ratna to rahul dravid
World Cup 2023 Rahul Dravid : फायनलमध्ये पराभवानंतर कोच द्रविडने सांगितले टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचे दृश्य

सुनिल गावस्कर यावेळी म्हणाले की, भारत सरकारने राहुल द्रविडला भारतरत्न देऊन सन्मानित केले पाहिजे. कारण तो एक उत्तम खेळाडू आणि कर्णधार होता.यंदा त्याने उत्तम कोचीक पण केली आहे. वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्डकप जिंकणे सोपे नव्हते पण त्याने हे करुन दाखवले.

तर दुसरीकडे कर्णधार असतांना इंग्लंडला जाऊन इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकणारा तो केवळ तिसरा भारतीय कर्णधार होता. यामळे त्याला भारतरत्न मिळायलाच हवा

bharat ratna to rahul dravid
Team India Victory Parade : झोमॅटोने मुंबईकरांची मागितली माफी ते KL राहुल का झाला ट्रेण्ड? ‘सोशल मीडिया’ नेमकं काय काय झालं व्हायरल?

.प्रशिक्षक म्हणून त्याने संघाला चांगले काम केले. त्यामुळे मला वाटते की, भारत सरकारने भारतरत्न देऊन द्रविडचा सन्मान करायला हवा. भारतरत्न, राहुल शरद द्रविड हे असे म्हणायला खूप छान वाटते.

bharat ratna to rahul dravid
KL Rahul: बीसीसीआयने पंतप्रधानांना जर्सी भेट देताच केएल राहुल का आला ट्रेंडिंगवर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com