
ग्लेन मॅक्सवेलची 'तामिळ' लग्नपत्रिका व्हायरल, लग्नाला यायचं बरं का!
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा भारतीय मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे हे आपण सर्वजण जानतोच. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि विनी रमन (Vini Raman) हे दोघेही आता लग्नंबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही लग्नपत्रिका ही तामिळ भाषेत आहे. त्यामुळे मॅक्सवेल - विनी रमन हे दोघे पारंपरिक तामिळ पद्धतीने लग्न करणार असल्याची शक्यता आहे. (Glenn Maxwell and Vini Raman Tamil Wedding Card)
हेही वाचा: VIDEO: नेपाळच्या 'या' विकेटकिपरचं क्रिकेट जगत का करतयं कौतुक?
ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन हे दोघे एकमेकांना 2017 पासून डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2020 मध्ये साखरपुडा केला होता. दरम्यानच्या काळात इतरांप्रमाणेच मॅक्सी आणि विनीच्या लग्नांत कोरोनाने विघ्न आणले होते. आता हे विघ्न दूर होण्याची चिन्हे दिसताच हे दोघे लग्नबंधनात (Glenn Maxwell Marriage) अडकणार आहेत. विनी ही मूळची भारतीय आहे मात्र आस्ट्रेलियात वास्तव्यास असते. ती एक फार्मासिस्ट आहे. विनीचा जन्म आणि शिक्षण दोन्हीही ऑस्ट्रेलियातच (Australia) झाले आहे. विनीच्या जन्माच्या आधीपासूनच तिचे आई वडील ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते.
हेही वाचा: Boycott Chennai Super Kings रैनामुळे नाही तर 'या' खेळाडूमुळे आहे ट्रेंडवर
मिळालेल्या माहितीनुसार या लग्नाला अनेक क्रिकेटपटू (Cricket Players) आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विनीची पाहुणी असलेल्या नंदिनी सत्यमूर्ती यांनी या दोघांच्या लग्नाची तामिळ पत्रिका (Tamil Wedding Card) पोस्ट केली आहे. त्यामुळे मॅक्सवेल आणि विनी तामिळ पद्धतीने लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत.
Web Title: Glenn Maxwell And Vini Raman Tamil Wedding Card Gone Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..