

Glenn Maxwell : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात ऐतिहासिक खेळी केली. तो वनडे क्रिकेटमध्ये चेस करताना द्विशतक ठोकणारा इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.
क्रॅम्प येत असतानाही ग्लेन मॅक्सवेल शेवटपर्यंत लढला आणि ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये घेऊन गेला. त्याने 128 चेंडूत 201 धावांची धडाकेबाज खेळी केली. अनेक जाणकारांनी ही वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात ग्रेट इनिंग असल्याचे म्हटले आहे. मात्र या इनिंगनंतर तो उर्वरित वनडे वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता आहे.
ग्लेन मॅक्सवेलची दुखापत
ग्लेन मॅक्सवेलची ही द्विशतकी खेळी वेदनांनी भरलेली होती. मुंबईच्या आद्रतायुक्त वातावरणात जसजशी मॅक्सवेलची इनिंग पुढे सरकत होती तसतचे त्याच्या संपूर्ण शरिरात क्रॅम्प येत होते. त्याला फक्त अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचाच नाही तर या क्रॅम्पशी देखील लढायचं होतं. मात्र शरीर साथ देत नसतानाही त्याने आपल्या संघाचा विजय एकहाती खेचून आणला.
मॅक्सवेलचं कौतुक कराल तितकं थोडं आहे. त्याला गेल्या सामन्यात दुखापतीमुळं संघाबाहेर रहावं लागलं होतं. गोल्फ कार्ट दुर्घटनेमुळे त्याला दुखापत झाली होती. तो अफगाणिस्ताविरूद्धच्या सामन्यात देखील खेळू शकणार की नाही याबाबत शंका होती.
ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तासोबत विजय मिळवत सेमी फायनल गाठला आहे. या सामन्याचा हिरो ग्लेन मॅक्सवेल पुढच्या सामन्याला मात्र मुकण्याची दाट शक्यता आहे. तो बांगलादेशविरूद्धचा सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.
त्यामुळे वर्ल्डकपमध्ये कधी चांगली तर कधी वाईट कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मॅक्सवेल वर्ल्डकपच्या शेवटच्या टप्प्यात अनफिट असणं परवडणारं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.