

Glenn Maxwell Retires
Esakal
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलनं मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाकडून त्याने एकूण २८६ सामने खेळले. यात त्यानं ७ हजार २२६ धावा केल्या. तर १३६ विकेटही घेतल्या. ऑस्ट्रेलियाला ३ वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूंमध्ये मॅक्सवेलचा समावेश आहे. २०१५, २०२३ चे एकदिवसीय वर्ल्डकप आणि २०२१च्या टी२० वर्ल्ड कप संघातही तो होता.