साईना, सिंधूसाठी अच्छा दिन

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

वुहान (चीन)/मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेतील प्रभावी कामगिरी कायम राखताना साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. जागतिक विजेती ओकुहारा सलामीलाच गारद झाल्यामुळे सिंधू, साईनाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. 

साईना, सिंधू दोन गेममध्येच जिंकत असताना श्रीकांतला तीन गमच्या खडतर लढतीस सामोरे जावे लागले. राष्ट्रकुल विजेत्या साईना नेहवालने सिंगापूरच्या याओ जिआ मीन हिला २१-१२, २१-९ हरविले; तर सिंधूने तैवानच्या पाई यू पो हिचा २१-१४, २१-१९ असा पाडाव केला. 

साईनासमोर जागतिक विजेत्या ओकुहारास हरविलेल्या गाओ फॅंगजिए हिचे आव्हान असेल, तर सिंधूची लढत चीनच्याच चेन झिओझिन हिच्याविरुद्ध होईल.

ओकुहारा सलामीलाच गारद
जागतिक विजेती नोझोमी ओकुहारा पहिल्याच फेरीत गारद झाली. गाओ फॅंगजिए हिने पाचव्या मानांकित ओकुहारास २१-१५, २३-२१ असे हरविले. साईनाची आता दुसऱ्या फेरीत लढत याच गाओविरुद्ध होणार आहे. ओकुहाराने जागतिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत साईना नेहवालचा; तर अंतिम फेरीत सिंधूचा पराभव केला होता. ओकुहारा पराजित झाल्यामुळे भारतीयांवरील मोठे दडपण दूर झाले असेल. 

श्रीकांत, प्रणॉयचा संघर्ष
अग्रमानांकित श्रीकांतने पहिला गेम गमावल्यावर जपानच्या केंता निशिमोतो याला हरविले. राष्ट्रकुल उपविजेत्या श्रीकांतने ही लढत १३-२१, २१-१६, २१-१६ अशी जिंकली. श्रीकांतप्रमाणेच साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉयला तीन गेमच्या लढतीनंतर विजय लाभला.

साईप्रणीतने सुप्पानयू अविहिंगसॅनॉन याला ६२ मिनिटांच्या लढतीत २१-१३, ११-२१, २१-१९ असे नमविले; तर एच. एस. प्रणॉयला केताफोन वॅंगचार्डेनविरुद्धच्या विजयासाठी २१-१५, १९-२१, २१-१९ असा संघर्ष करावा लागला. ही लढत ६७ मिनिटे चालली. समीर वर्मा सातव्या मानांकित चोऊ तिएन चेनविरुद्ध (तैवान) २१-२३, १७-२१ असा पराजित झाला.

पुरुष दुहेरीत एम. आर. अर्जुन-श्‍लोक रामचंद्रन आणि महिला दुहेरीत मेघना जाक्कामपुडी-पूर्वषा एस. राम यांनी विजयी सलामी दिली, पण मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा-अनुष्का पारेख आणि गौरव प्रसाद आणि जुही देवगण पराजित झाले.

Web Title: Good day for Saina, Sindhu