esakal | T20 WC Squad : अश्विनच्या सरप्राईज एन्ट्री मागचं कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

R Ashwin

T20 WC Squad : अश्विनच्या सरप्राईज एन्ट्री मागचं कारण...

sakal_logo
By
सुशांत जाधव

बीसीसीआय निवड समितीने आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. फिरकीपटूमध्ये युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) पहिली पसंती असल्यामुळे त्याला संघात स्थान मिळेल, अशी चर्चा टीम निवडीपूर्वी रंगली होती. मात्र चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या निवड समितीने ही चर्चा फोल ठरवली आहे. इंग्लंड दौऱ्यावर चार कसोटीत बाकावर बसवलेल्या रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) संघात स्थान देण्यात आले आहे.

बुधवारी रात्री बीसीसीआयने 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड केली. 4 फलंदाज 2 यष्टीरक्षक आणि 2 अष्टपैलूंच्या संघात 4 फिरकीपटू आणि 3 जलदगती गोलंदाजांचा समावेश आहे. युजवेंद्र चहलचा पता कट झाला असून अनुभवी अश्विनसह राहुल चाहर,अक्षर पटेल आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थीला पसंती मिळाली आहे.

हेही वाचा: ICC T20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

अश्विनने 2017 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर तो कसोटी सामन्यातच अधिक खेळताना दिसले. त्याचा नावाच विचार होईल, असे कुणालाच वाटले नव्हते. त्यामुळेच त्याला मिळालेली संधी ही आश्चर्यकारक वाटावी अशी आहे. यासंदर्भात एएनआयशी संवाद साधताना निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, अश्विन सातत्याने आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याची कामगिरीही उत्तम राहिलेली आहे. युएईच्या मैदानात तो संघासाठी उपयुक्त ठरु शकतो. याचा विचार करुनच त्याला संघात घेण्यात आले आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2021: Dhoni is Back! BCCIने दिली नवी जबाबदारी!

युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएलच्या गत हंगामात अश्विनने 15 सामने खेळले होते. यात त्याने 13 विकेट घेतल्या होत्या. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून पहिल्या टप्प्यातील 5 सामने खेळताना त्याने 1 विकेट मिळवली आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2021: Dhoni is Back! BCCIने दिली नवी जबाबदारी!

loading image
go to top