गुगलचे CEO पिचाईंचा AB साठी 'सुंदर' मॅसेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ab de villiers and sundar pichai
गुगलचे CEO पिचाई यांचा AB साठी 'सुंदर' मॅसेज

गुगलचे CEO पिचाई यांचा AB साठी 'सुंदर' मॅसेज

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्व क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्याने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. मागील तीन वर्षांपूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये त्याची फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याच्या भात्यातील फटकेबाजी पुन्हा तो आंतराष्ट्रीय संघात खेळताना दिसेल, याचे संकेत देणारी होती. यासंदर्भात चर्चाही रंगली होती. पण एबीने युवा खेळाडूंचे स्थान धोक्यात आणायचे नाही, असे सांगत पुन्हा आंतरराष्ट्रीय संघात परतणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

आता त्याने सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून अनेक चाहत्या त्याच्या 360 डिग्री स्टाइल फटकेबाजीला मुकणार आहेत. आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (Royal Challengers Bangalore (RCB) खेळताना दिसले होते.

हेही वाचा: ABD ने शेवटच्या क्रिकेट सामन्यात किती रन्स केल्या माहितीये?

त्याच्या निवृत्तीनंतर क्रीडा जगतासह अन्य क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. यात Google चे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांची प्रतिक्रिया लक्षवेधी अशीच आहे. पिचाई यांनी ट्विटरच्या माध्यमातून एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. एबी डिव्हिलियर्स हा आवडत्या खेळाडूंपैकी एक असून त्याची कारकिर्द खूपच उत्तम राहिली, असा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केलाय.

हेही वाचा: स्टार खेळाडू एबी डीव्हिलियर्सची IPL मधून तडकाफडकी निवृत्ती

आयपीएल स्पर्धा ही एबी डिव्हिलियर्सच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा ठरली. त्याने आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना 156 सामन्यात 4491 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनंतर आरसीबीकडून सर्वाधि धावा करणारा तो दुसरा खेळाडू होते. आरसीबीपूर्वी तो दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघातूनही खेळताना दिसले होते. 2015 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने 133 धावांची नाबाद खेळी केली होती. ही आयपीएलमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

loading image
go to top