फिक्‍सिंगच्या प्रयत्नांमुळे स्वीडनमधील क्‍लब फुटबॉल सामना पुढे ढकलला

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

गोटेनबर्गविरुद्धच्या सामन्यात पराभूत होण्यासाठी खराब खेळ करावा यासाठी एआयके संघातील एका खेळाडूला मोठ्या प्रमाणात लाच ऑफर करण्यात आली होती. याची माहिती फुटबॉल महासंघाला मिळाली, त्यांनी लगेचच एआयके आणि गोटेनबर्ग या दोन्ही संघांना सावध केले, तसेच पोलिस चौकशीही सुरू केली

स्टॉकहोल्म - गोटेनबर्ग आणि एआयके या आपल्या दोन क्‍लबमध्ये होणाऱ्या सामन्यात मॅचफिक्‍सिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे स्वीडन फुटबॉल महासंघाने हा सामना पुढे ढकलला आहे.

स्वीडिश फुटबॉलवर करण्यात आलेला हा "हल्ला' आम्ही गांभीर्याने घेत आहे, असा प्रकारास आम्ही थारा देणार नाही, असे स्पष्ट मत स्वीडन फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस हाकेन एस्‌जॉस्ट्रॅंड यांनी व्यक्त केले.

गोटेनबर्गविरुद्धच्या सामन्यात पराभूत होण्यासाठी खराब खेळ करावा यासाठी एआयके संघातील एका खेळाडूला मोठ्या प्रमाणात लाच ऑफर करण्यात आली होती. याची माहिती फुटबॉल महासंघाला मिळाली, त्यांनी लगेचच एआयके आणि गोटेनबर्ग या दोन्ही संघांना सावध केले, तसेच पोलिस चौकशीही सुरू केली. प्रामाणिक आणि खिळाडू वृत्तीने खेळ व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत असतो, असे एस्‌जॉस्ट्रॅंड यांनी म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांत स्वीडनमध्ये सामना निकाल निश्‍चितीचे प्रकार वाढले आहेत. चौकशी करूनही अद्याप हाती काहीच लागलेले नाही. गोटेनबर्ग हा स्वीडनमधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी क्‍लब आहे. त्यांनी 1982 आणि 1987 मध्ये यूएफा करंडक जिंकलेला आहे. मात्र यंदाचा मोसम त्यांच्यासाठी खराब गेलेला आहे. आठ सामन्यांनंतर ते सध्या 11 व्या स्थानी आहेत; तर एआयके सहाव्या क्रमांकावर आहे.

Web Title: Gothenburg v AIK: 'Match-fixing attempt' leads to Swedish fixture postponement