WPL Fastest Fifty : 4, 6, 6, 4, 4... गुजरात जायंट्सच्या डंक्लेची तुफान फटकेबाजी, हरमनचा मोडला विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPL Fastest Fifty Sophia Dunkley

WPL Fastest Fifty : 4, 6, 6, 4, 4... गुजरात जायंट्सच्या डंक्लेची तुफान फटकेबाजी, हरमनचा मोडला विक्रम

WPL Fastest Fifty Sophia Dunkley : वुमन्स प्रीमियर लीगच्या (Women's Premier League) पहिल्या दोन सामन्यात पराभव पदरी पडलेल्या गुजरात जायंट्सने आपल्या तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गुजरातची सलामीवीर सोफिया डंक्लेने सार्थ ठरवत दमदार सुरूवात करून दिली. सोफिया डंक्लेच्या 65 तर हरलीन देओलच्या 67 धावांच्या जोरावर गुजरातने 20 षटकात 7 बाद 201 धावा केल्या.

इंग्लंडच्या सोफी डंक्लेने पॉवर प्लेमध्येच तुफान फटकेबाजी करत 18 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तिने WPL 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा मुंबई इंडियन्सच्या हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडला. हरमनप्रीत कौरने गुजरात जायंट्सविरूद्धच 22 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. डंक्लेने प्रीतीच्या एकाच षटकात 4, 6, 6,4, आणि 4 अशी सलग चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या षटकात डंक्लेने तब्बल 23 धावा चोपल्या.

डंक्ले 28 चेंडूत 65 धावांची खेळी करून बाद झाली. त्यापूर्वी तिने हरलीन देओलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली. डंक्ले बाद झाल्यानंतर हरलीन आणि अॅश्लेघ गार्डनर यांनी गुजरातला 14 षटकात 135 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, गार्डनर 19 धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या हेमलताने 7 चेंडूत 16 धावा चोपत संघाला 157 धावांपर्यंत पोहचवले. मात्र ती देखील गार्डनरप्रमाणे हेमलताची देखील शिकार हेथर नाईटने केली.

दुसरीकडे एक बाजू लावून धरलेल्या हरलीने दरम्यान आपले अर्धशतक पूर्ण केले होते. ती अँकर इनिंग खेळत होती. दुसरीकडे अॅनाबेल सदरलँडने 8 चेंडूत 14 धावा करत गुजरातला 190 धावांच्या जवळ पोहचवले. आता डावाची शेवटची दोन षटके राहिली असताना कर्णधार स्नेह राणा 2 धावा करून धावबाद झाली.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर